ETV Bharat / state

नाशिक; खंडणीच्या वादातून जाळल्या चायनीज गाड्या; दोन संशयित ताब्यात

गोदाघाटावरील गाडगे महाराज पुलाजवळ चायनीज हातगाडे चालविणाऱ्या व्यावसायिकांना दररोज ३५० रुपये खंडणी मागितली. यावर या विक्रेत्यांनी नकार दिल्याने संशयितांनी त्याच दिवशी रात्री बारा वाजेच्या सुमारास येथील तीन चायनीज हातगाड्यांवर पेट्रोल ओतून पेटवून दिल्या.

खंडणीच्या वादातून जाळल्या चायनीज गाड्या
खंडणीच्या वादातून जाळल्या चायनीज गाड्या
author img

By

Published : Mar 28, 2021, 4:47 PM IST

Updated : Mar 28, 2021, 6:17 PM IST

नाशिक - गोदावरी नदीकाठच्या परिसरातील गाडगे महाराज पुलाजवळ चायनीजचे ३ हातगाडे जाळल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. खंडणीच्या वादातून ही घटना घडली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. अन्य एकजण फरार झाला आहे. अटक केलेल्यांमध्ये एकजण अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे.

खंडणीच्या वादातून जाळल्या चायनीज गाड्या

हातगाडी व्यावसायिकांना दररोज ३५० रुपयांची खंडणी

शुभम उर्फ शंभू गोरख जाधव व दर्शन उर्फ ओमकार रविंद्र सूर्यवंशी रा.नाशिक असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, त्यांना पंचवटी पोलिसांनी शिर्डी येथून अटक करण्यात आली आहे. गांधी तलाव येथील चार बोटी अज्ञातांनी जाळून टाकल्याची घटना घडली होती. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असताना, गुरुवारी रात्री गोदाघाटावरील गाडगे महाराज पुलाजवळील खंडेराव मंदिर परिसरातील तीन चायनीजच्या हातगाड्या आणि इतर साहित्य जाळून टाकल्याची घटना घडली होती. संशयितांनी येथील चायनीज हातगाडे चालविणाऱ्या व्यावसायिकांना दररोज ३५० रुपये खंडणी मागितली. यावर या विक्रेत्यांनी नकार दिल्याने संशयितांनी त्याच दिवशी रात्री बारा वाजेच्या सुमारास येथील तीन चायनीज हातगाड्यांवर पेट्रोल ओतून पेटवून दिल्या. या घटनेत तीनही चायनीज हातगाडे व इतर साहित्य जाळून खाक झाल्याने, विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शिर्डी येथून दोघा संशयितांना केली अटक...

पंचवटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत शिर्डी येथील एका बारमध्ये दोघा संशयितांना अटक केली आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर भद्रकाली, उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, यातील अन्य एकजण फरार झाला आहे. पोलीस त्याच्या मागावर असून, लवकरच त्यास अटक करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यानी सांगितले.

संशयितांचे फोन डिटेल तपासणार
गांधी तलाव येथील चार बोटी अज्ञातानी जाळून टाकल्याच्या घटनेबाबत पोलिसांनी हाती अद्याप कुठलीही माहिती लागलेली नाही. तसेच चायनीज गाड्या जाळणाऱ्या संशयितांनी या बोटी जाळ्या आहेत का त्याचादेखील पोलीस शोध घेत आहेत. याबाबत यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या फोन डिटेल्सची देखील तपासणी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा- घरात घुसून चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथखाला 24 तासांत लावला छडा

Last Updated : Mar 28, 2021, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.