ETV Bharat / state

नाशकात इंधन कंपन्यांच्या दोन बड्या अधिकाऱ्यांचा अकस्मात मृत्यू - इंधन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू नाशिक

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे इंधन कंपन्यांच्या दोन अधिकाऱ्यांचा अकस्मात मृत्यू झाला आहे. एकाचे नाव जालिंदर कालेकर, दुसऱ्याचे बी. एस. पवार होते. दोघांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

manmad nashik news  nashik latest news  नाशिक लेटेस्ट न्यूज  इंधन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू नाशिक  fuel company officers died nashik
नाशकात इंधन कंपन्यांच्या दोन बड्या अधिकाऱ्यांचा अकस्मात मृत्यू
author img

By

Published : Jun 17, 2020, 5:54 PM IST

मनमाड (नाशिक) - जिल्ह्यातील मनमाडजवळ असलेल्या इंडेन गॅस बॉटलिंग प्लांटमधील एक, तर इंडियन ऑइल कंपनीचा (आयओसी) एक अशा दोन अधिकाऱ्यांचा अकस्मात मृत्यू झाला आहे. यापैकी आयओसीचे अधिकारी हे १४ दिवसांसाठी क्वारंटाइन होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांचा मनमाड येथील अधिकारी निवासात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

नाशकात इंधन कंपन्यांच्या दोन बड्या अधिकाऱ्यांचा अकस्मात मृत्यू

आयओसीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव जालिंदर कालेकर होते. ते पानेवाडी प्रकल्पात टर्मिनल मॅनेजरपदावर कार्यरत होते. ते आपल्या कुटुंबीयांना भेटून नुकतेच पुण्यावरून परतले होते. त्यामुळे त्यांना १४ दिवसांसाठी कंपनीच्या अधिकारी निवासात क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी ते त्यांच्या खोलीमध्ये बेशुद्ध पडल्याचे सुरक्षा रक्षकाला दिसले. त्याने लगेच पानेवाडी येथील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर कालेकर यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कालेकर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा पोलीस तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेमध्ये बी. एस. पवार, असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. ते मनमाडजवळील पानेवाडी येथील इंडेन गॅस बॉटलिंग प्लांटमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते नाशिक येथे त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले असता हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

शवविच्छेदन अहवालानंतर दोघांच्याही मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. एकाच दिवशी दोन मोठ्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.