नाशिक - पिकअप आणि लक्झरी बसच्या अपघातात २ जण ठार झाले तर ८ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात नाशिक-मुंबई महामार्गावरील गोंदे गावाजवळच्या रोटे कंपनीसमोर झाला. या घटनेत पिकअपचा चालक आणि एक प्रवाशी ठार झालेत.
हेही वाचा - नाशिक : येवल्यातील कार अपघातात 3 ठार, 2 जखमी
टायर फुटल्याने घात झाला
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक-मुंबई महामार्गावरील गोंदे गावाजवळील रोटे कंपनीजवळून 8 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता पिकअप गाडी भरधाव वेगाने नाशिकच्या दिशेने येत होती. अशातच पिकअपचे टायर फुटल्याने ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि पिकअप गाडी दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात पिकअप गाडी चेंदामेंदा झाली आहे. पिकअप गाडीतील चालक आणि सह प्रवासी जागीच ठार झाले आहेत. या अपघाताची नोंद वाडीवरे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हेही वाचा - दोन ट्रकची समोरासमोर धडक... एक ठार, तर तिघे अत्यवस्थ