नाशिक- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बुधवारी नाशिक जिल्ह्यात 214 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. उपचार घेत असलेल्या तिघांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये मागील 9 दिवसात एका हजाराने रुग्णसंख्या वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या 3212 झाली आहे. जिल्ह्यात 192 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1754 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नाशिक महानगरपालिकेत 23 कोरोनाबाधित -
कोरोनाने नाशिक महानगरपालिकेत शिरकाव केला आहे. आतापर्यंत महानगरपालिकेतील 23 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात पालिका मुख्यालय 5,सातपूर विभागीय कार्यालय 7,मोरवाडी रुग्णालय 3, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय 8 जणांचा समावेश आहे.
नाशिक शहरात स्वयंस्फूर्तीने केलेल्या बंदला प्रतिसाद -
शहरातील पंचवटी,नाशिकरोड, सातपूर अशा सर्वच भागातील व्यापारी,दुकानदारांनी कोरोना मुक्ती साठी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला असून याला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. देवळाली भागातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शुक्रवार पासून येथील दुकानदार 15 दिवस लॉकडाऊन करणार आहेत.
नाशिक जिल्ह्याची परिस्थिती -
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण- 3212
-कोरोनामुक्त -1754
-एकूण मृत्यू- 192
-एकूण उपचार घेत असलेले रुग्ण-1266
-प्रलंबित अहवाल 497
-आता तपासणीसाठी घेतलेले नमुने -18616