ETV Bharat / state

मनमाडला तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू - मनमाड नाशिक अपघात

मनमाडला पुणे-इंदौर महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक कार आणि मोटरसायकलवर पलटी झाला. या विचित्र अपघातात मोटारसायकल वरील प्रवीण सूर्यवंशी आणि रवींद्र गोडसे या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील सर्व 5 जण सुदैवाने बचावले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.

मनमाड
मनमाड
author img

By

Published : Jan 12, 2021, 2:55 PM IST

मनमाड (नाशिक) - मनमाडला पुणे-इंदौर महामार्गावर ट्रक, कार आणि मोटारसायकलचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात ट्रक पूर्णपणे कार आणि मोटारसायकलवर उलटल्याने यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

मनमाड

मनमाडला पुणे-इंदौर महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक कार आणि मोटरसायकलवर पलटी झाला. या विचित्र अपघातात मोटारसायकल वरील प्रवीण सूर्यवंशी आणि रवींद्र गोडसे या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील सर्व 5 जण सुदैवाने बचावले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-इंदौर महामार्गावर रोज अपघात होत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला असून बेथेल चर्च या परिसरात असलेले गतिरोधक धोकादायक बनले आहेत. या ठिकाणी दिशादर्शनासाठी फलक नसल्याने देखील अपघात होत आहेत. पथकर नाका कंपनीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

बेथेल चर्च ते महादेव मंदिर परिसरात जास्त अपघात..!

शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर महामार्गावर कॅम्प भागात असलेल्या बेथेल चर्च ते महादेव मंदिर परिसरात असलेल्या गतिरोधक वाहन चालकांच्या लक्षात येत नाही. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर अपघात होतात, याठिकाणी दिशा दर्शक फलक लावावे जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.