ETV Bharat / state

नाशकात दुचाकीला टिप्परची धडक, 2 महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू, 1 जखमी - नाशिक अपघात बातमी

गजानन पार्क अपाटमेंट समोर नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकी आणि टिप्परचा अपघात झाला आहे. यात दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी आहे.

नाशिक रोड परिसरात दुचाकीचा अपघात
नाशिक रोड परिसरात दुचाकीचा अपघात
author img

By

Published : Feb 14, 2020, 8:58 PM IST

नाशिक- शहरातील गजानन पार्क अपार्टमेंट समोरील नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकी आणि टिप्परचा अपघात झाला आहे. यात दुचाकीवरील आदर्श रोहिदास कराड (वय १७), आकाश गवळी (वय २२) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ज्ञानेश्वर बाळू केदारे (वय २४) गंभीर जखमी आहे.

हेही वाचा- पुलवामा हल्ला : 'या 'महाराष्ट्राच्या सुपुत्राने ४० हुतात्म्यांच्या घरची माती केली गोळा, आज हुतात्मा स्मारकावर ठेवून वाहिली श्रद्धांजली

जखमीवर बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर टिप्पर चालक फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरिक्षक सुरज बिजली, वाहतूक निरिक्षक के.डी.पाटील, दाखल झाले होते. दरम्यान, नाशिक रोड पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील दुचाकीवरील तिघेही महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.