नाशिक - गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव तालुक्याला सर्वाधिक पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात 54 हजार 877 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. तर 152 गावातील 69 हजार 269 शेतकरी बाधित झाल्याचे शासनाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
कायम दुष्काळी तालुके म्हणून नांदगाव, मालेगाव तालुक्यांना मागील दोन दिवसात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. फळबागांची पुरती वाट लागली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास 54 हजार 877 हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत. तर 7 हजार कोंबड्या मृत पावल्या असून 104 घरांची पडझड झाली आहे. सर्वाधिक नुकसान नांदगाव तालुक्यातील पिकांचे झाले आहे.
हे ही वाचा - साकीनाकातील निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे- भाई जगताप
खालील पिकांचे सर्वाधिक नुकसान
पीक | हेक्टरी नुकसान |
बाजरी | 7,676 हेक्टर |
मका | 6 हजार 936 हेक्टर |
ज्वारी | 25 हेक्टर |
तूर | 3.30 हेक्टर |
कापूस | 15,250 हेक्टर |
कांदा | 6 हजार 183 हेक्टर |
कांदा रोप | 863 हेक्टर |
भाजीपाला | 344 हेक्टर |
डाळिंब | 5 हेक्टर |
द्राक्ष | 6.67 हेक्टर |
सोयाबीन | 180 हेक्टर |
हे ही वाचा - धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती राहल्याने केली आत्महत्या
अतिक्रमित नुकसानग्रस्तांना मदत नाही -
ज्या घरांची किंवा कुठल्याही मालमत्तेची सरकार दप्तरी नोंद आहे. अशाच अधिकृत बाबींसाठी शासनाकडून मदत जाहीर केली जाते. त्यामुळे नांदगाव तालुक्यात नदी-नाल्यांच्या परिसरातील सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण करीत बांधलेल्या झोपडया, घरे अशा नुकसानग्रस्तांना मदत मिळणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.