ETV Bharat / state

पांडव लेणीवर अडकून बसलेल्या दोघांना अग्निशामक दलाच्या जवांनानी सुखरुप उतरवले - अग्निशमन

चौघेजण परवाना नसतानाही पांडवलेणी येथील डोंगरमाथ्यावर गेले आणि अडकून बसले. जवानांनी दोरखंड घेऊन डोंगर माथा गाठला आणि अडकलेल्या दोघांना दोरखंडाच्या साह्याने डोंगरावरून सुखरूप उतरवले.

पांडवलेणी येथे अडकले दोघेजण
author img

By

Published : May 28, 2019, 11:49 PM IST

नाशिक - उन्हाळ्याच्या सुट्टी चालू असल्याने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पांडव लेण्याच्या डोंगराळ भागातील निसर्गरम्य वातावरणाची सैर करण्यासाठी जातात. परंतु, आज (मंगळवार) चौघेजण परवाना नसतानाही पांडवलेणी येथील डोंगरमाथ्यावर गेले आणि अडकून बसले.

पांडवलेणीपर्यंत जाण्यास पर्यटकांना मुभा आहे. मात्र, लेणी ओलांडून राखीव वनक्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करुन डोंगरावर चढण्यास भारतीय वन कायद्यानुसार गुन्हा आहे. पांडव लेणी परिसरात ४ मित्रांनी आज (मंगळवार) दुपारी लेणी बघितल्यानंतर ट्रेकिंगचा थरार अनुभवायचा म्हणून डोंगरावर चढायचे ठरवले. निलेश कुलकर्णी, गर्व सावलाणी, वंश पंजाबी आणि मीत ककरेजा (राहणार भाभानगर) यांनी डोंगर सर करण्यास सुरुवात केली. निलेश आणि गर्व डोंगराच्या माथ्यावर पोहोचले. तर, वंश आणि मीत हे डोंगराच्या पायथ्यापासून काही उंचीवर थांबले. परंतु, खाली उतरताना त्यांना आपण सुखरुप पोहचू शकत नाही, असे निलेश आणि गर्वला जाणवले. त्यामुळे त्यांनी डोंगराच्या पायथ्याला थांबलेल्या वंश आणि मीतला कळविले.

वंश आणि मीतने ही गोष्ट परिसरातील नागरिकांना सांगितली. नागरिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांची मदत मागितली. काही वेळातच जलद पथकाचे कमांडो, सिडको अग्निशामक उपकेंद्राचे जवान पांडव लेणी डोंगरावर पोहोचले. जवानांनी दोरखंड घेऊन डोंगर माथा गाठला आणि अडकलेल्या दोघांना दोरखंडाच्या साह्याने डोंगरावरून सुखरूप उतरवले.

Intro:उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्याने विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात पांडवलेण्याच्या निसर्गरम्य वातावरण धमाल करायची म्हणून जात असतात आज अशीच चार हौशी मित्र पांडवलेणी येथे डोंगरमाथ्यावर अडकले

Body:पांडवलेणी पर्यंत जाण्यास पर्यटकांना मुभा असून मात्र लेणी ओलांडून राखीव वन क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करून डोंगर सर करण्यास भारतीय वन कायद्यानुसार गुन्हा आहे तरीदेखील चार तरुण डोंगर सर करण्याचा प्रयत्नात माथ्यावर पोहोचले आणि तेथून पुन्हा खाली येताना डोळे गरगरू लागल्याने तरूणाचा आत्मविश्वास ढासळला व आपण सुखरूप खाली उतरू येऊ शकत नसल्याने त्यांनी डोंगर पायथ्याला असलेल्या अन्य मित्रांना कळविले त्यानंतर मित्रांनी पोलिस नियंत्रण कक्ष अग्निशमन दलाशी संपर्क साधून आपत्कालीन मदत मागितली जलद प्रतिसाद पथकातील दलाच्या जवानांनी धाव घेऊन डोंगरमाथ्यावरून अडकून पडलेल्या 4 हौशी तरुणांना सुखरूप खाली उतरविले

Conclusion:पांडवलेणी परिसरात चार मित्र आज दुपारी लेणी बघितल्यानंतर ट्रेकिंगचा थरार अनुभवायचा म्हणून निलेश कुलकर्णी ,गर्व सावलाणी, वंश पंजाबी,मीत ककरेजा राहणार भाभानगर या चौघा युवकांनी डोंगर सर करण्यास सुरुवात केली निलय व गर्व हे दोघे डोंगराच्या माथ्यावर पोहोचली तर वंश व मीत हे डोंगराच्या पायथ्यापासून काही उंचीवर असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन या दोघांना सुखरूप खाली उतरविले मात्र डोंगरमाथ्यावर पोहोचलेल्या दोघांना उंचीवरून चक्कर येऊ लागल्याने त्यांचे पुन्हा खाली उतरून येण्याचे धाडस झाले नाही दोघा मित्रांनी जवळपासच्या नागरिकांना हा प्रकार घडल्याचं सांगितलं तेव्हा नागरिकांनी पोलिस अग्निशमन दलाच्या जवानांची मदत मागितली काही वेळेतच जलद पथकाचे कमांडो सिडको अग्निषमक उपकेंद्राचे जवान आवश्यक सामग्री घेऊन पांडवलेणी डोंगरावर पोहोचले आणि बचावकार्य सुरु केले जवानांनी दोरखंड घेऊन डोंगर माथा गाठला अडकलेल्या दोघांना मित्रांना दोरखंडाच्या साह्याने डोगरावरून सुखरूप उतरविले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.