मालेगाव : पीएफआय या संघटनेच्या पदधिकारी (PFI office bearer ) यांची धरपकड सुरूच असुन आज मालेगाव येथून मौलाना इरफान दौलत नदवी (Maulana Irfan Daulat Nadvi ) यांना मालदा शिवारतून तर मोहमद सादन याला शहरातील मध्य भागातून अटक करण्यात आली आहे. एलसीबीने ही कारवाई केली असुन कलम 151 अंनव्ये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
11 राज्यात कारवाई : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येत असुन देशातील जवळपास 11 राज्यात ही कारवाई करण्यात येत आहे. आज देखील मालेगाव येथून ऑल इंडिया इमाम कौन्सिल प्रेसिडेंट मौलाना इरफान दौलत नदवी व पी एफ आय सदस्य असलेला मोहमद सादन यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांवर सिटी पोलीस स्टेशन व पवारवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांची चौकशी सुरू आहे.
एलसीबीची कारवाई : आज मालेगाव मध्ये जी धाड टाकण्यात आली ती धाड एटीएस किंवा एनआयए तर्फे नाही तर लोकल क्राईम ब्रँच तर्फे टाकण्यात आली त्यांच्यावर भडकाऊ भाषण केल्याचा आरोप ठेवून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.