ETV Bharat / state

Trimbakeshwar temple entry row: त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसणाऱ्यांविरोधात कारवाई करा, अन्यथा राज्यातील मंदिरे दोन दिवस बंद -हिंदू महासभा - त्र्यंबकेश्वर मंदिर घुसखोरी प्रकरण

त्र्यंबकेश्वर मंदिरात संदलची चादर घेऊन जाणाऱ्यांविरोध कारवाई करण्यासाठी हिंदू महासभेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराचा मुद्दा तापला आहे.

Trimbakeshwar temple entry row
त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश वाद
author img

By

Published : May 17, 2023, 11:58 AM IST

Updated : May 17, 2023, 12:32 PM IST

नाशिक- त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदू महासभेकडून शुद्धीकरण करण्यात आले आहे. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी मंदिराच्या पायऱ्यावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण्यात केलेहे . मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे. जर अटक केली नाही तर, राज्यातील मंदिरे २ दिवस बंद ठेवणार असल्याचे हिंदू महासभेने म्हटले आहे.आहे. दरम्यान, मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी उरूस आयोजकांसह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात कलम २९५ (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रार्थनास्थळाला इजा करणे किंवा अपवित्र करणे) आणि ५११ (आजीवन कारावास किंवा अन्य शिक्षेस पात्र गुन्हा करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा) नुसार प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविण्यात आला. हा गुन्हा तक्रारीच्या आधारे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

काय आहे प्रकरण- अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिराच्या प्रवेशद्वारावर आलेल्या गटातील सदस्यांमध्ये स्थानिक लोकांचादेखील समावेश होता. त्यांनी मंदिर अधिकाऱ्यांना अनेक दशकांच्या परंपरेनुसार प्रवेशद्वारावर धूप दाखविण्याची परवानगी मागितली होती. त्यांची विनंती नाकारण्यात आल्याने, गट त्या ठिकाणाहून परतला. शनिवारी रात्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी त्या गटाचा प्रयत्न हाणून पाडला, असे मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.घुसखोरीचा प्रयत्न झाल्याने मंदिर ट्रस्टने पोलिसांकडे तक्रार केली होती. या घटनेच्या काही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

एसआयटी करणार चौकशी- नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात विशिष्ट समुहाच्या लोकांनी बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग असल्याने मंदिर व्यवस्थापनाच्या नियमानुसार केवळ हिंदूंनाच मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी आहे. फडणवीस यांनी नेमलेल्या एसआयटीमध्ये अतिरिक्त महासंचालक (एडीजी) दर्जाचा अधिकारी हा एसआयटीचे प्रमुख असणार आहे. एसआयटी गेल्या वर्षी घडलेल्या अशाच घटनेचीही चौकशी करणार आहे.

हेही वाचा-

  1. Trimbakeshwar Temple Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर ; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
  2. Gautami Patil program: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; मद्यपी तरुणांकडून माध्यम प्रतिनिधींना मारहाण
  3. Nashik Water Crisis : नाशिकमध्ये पाणी टंचाई; महिलांना खोल विहिरीत उतरून भरावं लागतंय पाणी

Last Updated : May 17, 2023, 12:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.