नाशिक - राज्याच्या कृषी विभागाकडून कृषी दिनाचे औचित्य साधून राज्यभर कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढ या त्रिसूत्रीवर आयोजित या सप्ताहाचे उद्घाटन आज (बुधवार) राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जात कृषी मंत्री दादा भुसे यांनी या सप्ताहाचे उद्घाटन केले.
सदोष बियाणांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत सरकार गंभीर आहे. या प्रकरणांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरच दोषी कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन देत सरकारच्या महाबीज बियांणांमध्ये दोष आढल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा कृषी मंत्री भुसे यांनी यावेळी दिला.
हेही वााचा - विठ्ठला, राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर; मुख्यमंत्र्याचे विठ्ठलाला साकडे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी १ जुलै हा दिवस ‘कृषी दिन’ साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यात यावर्षी देखील १ ते ७ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. बुधवारी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत कृषी संजिवनी सप्ताहाचे उदघाटन त्रंबकेश्वर तालुक्यातील कोणे आणि साप्ते या गावात करण्यात आले. मंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या समस्या जाणून घेत या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात केला.
यावेळी कृषी मंत्र्यांच्या हस्ते आदिवासी महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी ‘कृषी संजीवनी सप्ताह’ साजरा करुन शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी यंदाच्या वर्षी ‘पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ’ या त्रिसुत्रीचा अवलंब करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यक्रमाच्या सुरुवातीला फळबाग शेतीशाळा वर्ग कार्यपध्दती पुस्तिका, विविध योजना यशोगाथा या प्रचार आणि प्रसिध्दी साहित्याचे विमोचन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा - शरद पवारांबद्दल समाजमाध्यमांवर अक्षेपार्ह मजकूर; भाजप सभापतीविरोधात गुन्हा दाखल
सप्ताह कालावधीत गावातील शेतकऱ्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन, व्हिडिओ कॉन्फरन्स, वेबिनार, व्हॉट्सॲप ऑडिओ क्लिप्स, आकाशवाणी, युट्युब चॅनेल या माध्यमातून तसेच सुरक्षित अंतर राखून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक गावपातळीवर उपलब्ध करुन देण्यात येणार असून याचा मोठा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याने हा कृषी सप्ताह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसारगर, कृषी समिती सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित होते.