नाशिक - दुगारवाडी धबधब्यातील पाण्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे तीनही मृतदेह सापडले आहेत. औरंगाबाद कृषी विद्यापीठात शिकणारे सहा विद्यार्थी सहलीसाठी दुगारवाडी धबधब्यावर आले होते.
हेही वाचा - नाशिक: औरंगाबाद येथील बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला; दोघांचा शोध सुरू
पाण्याचा अंदाज न आल्याने या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अनुष्का, रघुवंशी व कोटा रेड्डी अशी मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी औरंगाबाद कृषी विद्यापीठात शिक्षण घेत होते.