नाशिक - जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. जिल्ह्यात वीज कोसळून 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पावसामुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याआधीच सरकारने आरेतील झाडांची कत्तल केली - नीलम गोऱ्हे
इगतपुरी तालुक्यातील भरत भले, हिराबाई सदगीर तर दिंडोरी तालुक्यातील यमुनाबाई गांगोडे या तिघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. ईगतपुरी तालुक्यात विजेचा गडगडाट व जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. यामध्ये हीराबाई कारभारी सदगीर (वय 47, रा. तळेगाव बुद्रुक, ता. इगतपुरी) या तळेगाव जवळील जीवन प्राधिकरण डॅमच्या जवळील शेतात गुरे चारण्यासाठी गेले त्यावेळी वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांचे पती कारभारी सदगीर यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा- 'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील'
हीराबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इगतपुरी ग्रामीण रूग्णातयात दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत भरत भाऊराव भले (वय 40, बारशिंगवे, राहुल नगर, ता. इगतपुरी) यांचाही वीज पडून मृत्यू झाला.