नाशिक- जिल्ह्यात बुधवारी तब्बल 339 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक 253 रुग्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 453 वर गेली आहे. यातील 2 हजार 455 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नाशिक शहरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात शंभर ते दिडशे रुग्णांची नोंद एका दिवसात होत होती. मात्र, बुधवारी रुग्णसंख्या 339 ने वाढली आहे.
आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 240 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.यात नाशिक मनपा क्षेत्रातील 107 रुग्णांचा समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात असल्याने प्रशासनाने सायंकाळी 7 ते पहाटे 5 पर्यंत जनता कर्फ्यू अधिक कडक केला आहे. या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
बुधवारी वाढलेले कोरोनाबाधित रुग्ण
नाशिक मनपा-253
नाशिक ग्रामीण -69
मालेगाव मनपा-11
जिल्हा बाह्य- 6
नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची कोरोना परिस्थिती
नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्ण 4453
-कोरोनामुक्त - 2455
-एकूण मृत्यू -240
-एकूण उपचार घेत असलेले रुग्ण-1758
-नवीन संशयित -646
-प्रलंबित अहवाल 497
-आता पर्यंत घेतलेले स्वॅब -22188