ETV Bharat / state

नाशिकातून हजारो टन कांदा बांगलादेशला रवाना; व्यापाऱ्यांना दिलासा, तर शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

author img

By

Published : Jul 7, 2020, 2:52 PM IST

मनमाडसह जिल्ह्यातील इतर भागातील व्यापारी सर्वात जास्त कांदा बांगला देशात निर्यात करतात. यापूर्वी ते पश्चिम बंगालला कांदा पाठवीत होते. तेथून बांगलादेशात कांदा पाठविला जात होता. मात्र, यंदा प्रथमच मनमाड येथून थेट बांगलादेशात मालगाडी पाठविण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे व्यापारी थेट बांगलादेशात कांदा पाठवीत आहे.

onion export to bangladesh  onion export nashik  nashik onion news  nashik latest news  नाशिक कांदा निर्यात  कांदा निर्यात बांगलादेश  नाशिक लेटेस्ट न्यूज
नाशिकातून हजारो टन कांदा बांगलादेशला रवाना; व्यापाऱ्यांना दिलासा, तर शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

मनमाड (नाशिक) - लॉकडाऊन अनलॉक करण्यात आल्यानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यासह विदेशात कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्यापाऱ्यांनी मनमाडच्या माल धक्क्यावरून प्रथमच १५ मालगाडीच्यामधून तब्बल २५ हजार टनपेक्षा जास्त कांदा थेट बांगलादेशात पाठविला आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणात ट्रकच्या माध्यमातून कांदा पाठविला जात आहे. कांदा निर्यात खुली होऊन भावात वाढ होईल, अशी शेतकऱ्यांना अशा होती. मात्र, कांद्याच्या भावात वाढ होण्याऐवजी त्यात घसरण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

मनमाडसह जिल्ह्यातील इतर भागातील व्यापारी सर्वात जास्त कांदा बांगलादेशात निर्यात करतात. यापूर्वी ते पश्चिम बंगालला कांदा पाठवीत होते. तेथून बांगलादेशात कांदा पाठविला जात होता. मात्र, यंदा प्रथमच मनमाड येथून थेट बांगलादेशात मालगाडी पाठविण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे व्यापारी थेट बांगलादेशात कांदा पाठवीत आहे. आतापर्यंत मनमाड येथून सुमारे १५ मालगाडीमधून कांदा पाठविण्यात आला आहे. एका मालगाडीच्या रॅकमध्ये ४२ डबे असतात. एका डब्याची क्षमता सुमारे ४० टनाची असते. त्यामुळे आतापर्यंत मनमाडच्या माल धक्क्यावरून बांगला देशात ६३० डब्यातून २५ हजार २०० टन कांदा निर्यात करण्यात आला आहे.

व्यापारी दुबई, मलेशिया, सौदी अरेबिया, शिंगापूर, श्रीलंका, दमाम, व्हिएतनाम यासह इतर देशात कंटेनरच्या माध्यमातून तर देशांतर्गत पंजाब, बिहार, कर्नाटक, दिल्ली यासह इतर राज्यात रेल्वे आणि ट्रकद्वारे कांदा पाठवतात. एका कंटेनरची क्षमता २९ टनाची असते, तर ट्रकची क्षमता २५ ते ३० टनाची आहे. कंटेनर जहाजातून पाठविले जातात. आतापर्यंत कंटेनरच्या माध्यमातून हजारो टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. शिवाय देशांतर्गत देखील मोठ्या प्रमाणात कांदा पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एकीकडे हजारो टन कांदा निर्यात होत असताना दुसरीकडे मात्र त्याचा कोणताही फायदा आम्हाला झाला नसल्याचे शेतकरी सांगतात. आजही कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने त्यातून पिकावर केलेला खर्च देखील निघत नाही. त्यामुळे आमच्यावर असलेले संकट आजही कायम असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.