ETV Bharat / state

नाशिक रन २०२० : समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी, हजारो नाशिककर धावले - Nashik Run-2020 news

शनिवारी सकाळी महात्मानगर येथील मैदानापासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. यंदा प्रथमच दहा किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. १५ ते ३५, ३६ ते ५० आणि ५१ वर्षांपुढील गटासाठी ही स्पर्धा पार पडली.

Thousands of citizens  ran for this year's 'Nashik Run-2020'
नाशिक रन २०२० : समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी, हजारो नाशिककर धावले
author img

By

Published : Jan 11, 2020, 1:32 PM IST

Updated : Jan 11, 2020, 5:42 PM IST

नाशिक - समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी, यासाठी प्रतिष्ठित 'नाशिक रन'मध्ये नाशिककर धावले. शहरातील विविध कंपन्यांतर्फे एकत्रित येत सामाजिक बांधिलकीतून समाजाप्रती जबाबदारी पार पाडण्यासाठी जानेवारी २००३ पासून 'नाशिक रन'चे आयोजन केले जाते. या उपक्रमामुळे संकलित होणाऱ्या निधीच्या माध्यमातून शैक्षणिक गरजा, पिण्याचे पाणी, संगणक शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच नाशिककरांच्या आरोग्याबद्दल विविध उपक्रम राबवले जातात.

समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी, हजारो नाशिककर धावले

हेही वाचा - #HBDRahulDravid : पदार्पणाच्याच सामन्यात 'निवृत्त' झालेला एकमेव क्रिकेटपटू!

शनिवारी सकाळी महात्मानगर येथील मैदानापासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. यंदा प्रथमच दहा किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. १५ ते ३५, ३६ ते ५० आणि ५१ वर्षांपुढील गटासाठी ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्याला सात हजार, द्वितीय क्रमांकाला पाच हजार आणि तृतीय क्रमांकाला तीन हजार अशा रोख रूपयांचे बक्षिस देण्यात आले. 'नाशिक रन'कडे देणगी स्वरूपात प्राप्त होणारा निधी कुठल्याही कार्यालयीन कामासाठी खर्च केला जात नाही. गेल्या वर्षी जमा झालेल्या ८७ लाख रूपयांमधील बराचसा निधी सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्यात आला होता.

या स्पर्धेचे उद्धाटन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते झाले. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महाजन बंधू, अनिरुद्ध आत्मी, नारायण वाघ, अश्विनी देवरे, मनीषा रोंदळ, हे ह्या मॅरेथॉनचे ब्रँड अँबेसिडर आहेत.

Intro:समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी म्हणून हजारो नाशिककर धावले..

Body:समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी म्हणून आज नाशिक रन मध्ये हजारो नाशिककर धावले..या रन मध्ये लहानपणापासून ते जेष्ठ नागरीकांनी सहभाग घेतला...

शहरातील विविध कंपन्यांनी एकत्रित येत सामाजिक बांधिलकीतून समाजाप्रती जबाबदारी पार पाडण्यासाठी जानेवारी 2003 पासून नाशिक रन चे आयोजन केलं जाते, ह्या नाशिक रन च्या माध्यमातून संकलित होणाऱ्या निधीच्या माध्यमातून शैक्षणिक गरजा, पिण्याचे पाणी, संगणक शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच नाशिककरांच्या आरोग्याबद्दल विविध उपक्रम राबवले जातात,

आज सकाळी महात्मा नगर येथील ग्राउंड पासून महात्मा नगर येथील ग्राउंड पासून रन ला सुरवात झाली, यंदा प्रथमच दहा किलोमीटर मॅरेथॉनचे ही आयोजित करण्यात आला होतं,यासोबत 15 ते 35, 36 ते 50,व 51 पुढील वयोगटात ही मॅरेथॉन पार पडली, प्रत्येक गटात प्रथम क्रमांक सात हजार, द्वितीय क्रमांक पाच हजार तर तृतीय क्रमांक तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन देण्यात आलं,नाशिक रन कडे देणगी रूपाने जमा होणारा निधी हा नाशिक रन च्या कुठल्याही कार्यालयीन कामासाठी खर्च केला जात नाही, गेल्या वर्षी 87 लाख रुपयांचा निधी जमा झाला होता,यात कंपनी व्यवस्थापनाने तब्बल पावणे दोन कोटी रुपये विविध सामाजिक उपक्रमांवर खर्च केले...

यावेळी नाशिक मॅरेथॉनला जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी झेंडा दाखवला,यावेळी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महाजन बंधू,अनिरुद्ध आत्मी, नारायण वाघ, अश्विनी देवरे,मनीषा रोंदळ,हे ह्या रचे ब्रँड अँबेसिडर होते,या मॅरेथॉन मध्ये लहानपणापासून ते जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते...
टीप फीड ftp
nsk-nashik run viu 1
nsk-nashik run viu 2
nsk-nashik run viu 3
nsk-nashik run viu 4

Conclusion:
Last Updated : Jan 11, 2020, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.