नाशिक - दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरट्याने 1 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
मोहाडी येथील धनगर वाडा परिसरातील शिवाजी ढेपले हे बुधवारी २२ जानेवारीला कुटुंबासह अंतापूर ताराबाद येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरातील 50 हजार रुपयाच्या सोन्याचा नेकलेस, 60 हजार रुपयांची सोन्याची चेन, 15 हजार रुपयांचे सोन्याचे कानातले आणि 15 हजार रुपये रोकड असा एकूण 1 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
ढेपले कुटुंबीय दुसऱ्या दिवशी ३ वाजता अंतापूर ताराबाद येथून घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दिंडोरी पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहे.