ETV Bharat / state

नाशिकमध्ये दुचाकीची चोरी; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

author img

By

Published : Jul 1, 2019, 8:46 PM IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी महाराज मंदिरच्या पार्कींगमधून दुचाकी लांबविल्याची घटना समोर आली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये कैद झालेले चोरीच्या घटनेचे दृष्य

नाशिक- मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी महाराज मंदिराच्या पार्कींगमधून दुचाकी चोरल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले चोरीच्या घटनेचे दृष्य

गुणवंत देशमुख यांची दुचाकी (एम.एच १५ सी. एल ७२२७) मुंबई-आग्रा महामार्गवरील बळी महाराज मंदिराच्या पार्किंगमध्ये उभी होती. दरम्यान एक अज्ञात तरुण तेथे आला. त्याने त्याच्या जवळच्या बनावट चावीने काही गाड्यांचे लॉक खोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यात यश मिळाले नाही. परंतु, गुणवंत देशमुख यांच्या गाडीचे लॉक खोलण्यात तो यशस्वी झाला. त्यानंतर तो तरुण पार्किंगमधून गाडी घेऊन पसार झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी चोरांनी शहरात उच्छाद मांडला असून या प्रकारामुळे वाहन चालक हैरान झाले आहेत. एकूणच नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अयशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नासल्याचे चित्र शहरात दिसून येते आहे.

Intro:मोटार सायकल चोर सीसीटीव्ही मध्ये कैद...नाशिक मध्ये चोऱ्याचं सत्र सुरूच..

Body:नाशिकच्या मुंबई -आग्रा महामार्गवरील बळी महाराज मंदिरच्या पार्कींग मधून दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद,पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल..

नाशिक शहराची लोकवस्ती जशीच्या तशी विस्तारत गेली तशी तशी वाहनांच्या संख्येतही कमालीची वाढ होत गेली, यात दुचाकीचे प्रमाण अधिक आहे, मात्र चोरटे यांसाठी दुचाकी चोरीचा फंडा स्वागतार्ह ठरला,सद्यस्थितीत नाशिक मध्ये एकही पोलीस ठाण्याचे नसेल जिथे रोजच दुचाकी चोरीची तक्रार दाखल होत नसेल,पोलिस अनेकदा दुचाकी चोरांना पकडतात पण चोरीचे प्रकार मात्र थांबले नाहीत,मुंबई आग्रा महामार्गावरील बळी मंदिरच्या बाहेर वाहन तळावरील एक दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे, एक तरुण जवळच्या डुप्लिकेट चावीनी काही गाड्या चेक करतो,मात्र हे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर तिथेच एक दुचाकी सहज रित्या चोरून घेऊन जातो, या अज्ञात चोरट्याने गुणवंत देशमुख यांची एम एच 15 सीएल 7227 ही दुचाकी चोरून नेले,याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दुचाकी चोरांनी शहरात उच्छाद मांडला असून या प्रकारामुळे वाहन चालक हैरान झालेत,एकूणच नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासन अयशस्वी ठरत असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नासल्याचे चित्र दिसून येते आहे...

टीप फीड ftp
nsk -bike thief viu 2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.