ETV Bharat / state

नाशिक शहरात सध्या तरी पाणीकपात नाही; महापौरांनी पाहणी करत घेतला आढावा

गंगापूर धरण समूहामध्ये 47 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नाशिक शहरात पाणीकपात केले जाणार नसल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

महापौरांनी घेतला आढावा
महापौरांनी घेतला आढावा
author img

By

Published : May 23, 2021, 11:06 AM IST

नाशिक - गंगापूर धरण समूहामध्ये 47 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नाशिक शहरावर घोंगावत असलेले पाणीकपातीचे संकट तूर्तास तरी टळले आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी गंगापूर धरण समूहाचा पाहणी दौरा केला यावेळी त्यांनी सध्या तरी पाणी कपात केली जाणार नसल्याचं स्पष्ट केले आहे.

नाशिक शहरात सध्या तरी पाणीकपात नाही

पाणीकपत होणार नसली तरी पाणी जपून वापरा - महापौर

नाशिक जिल्ह्यामध्ये मागील वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वच धरणांमध्ये 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, वर्षभरामध्ये पाण्याची मागणी आणि नियोजन यामुळे मार्च महिन्यामध्ये धरणांमधील पाणीसाठा 50 टक्क्यांहून कमी झाला आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांना पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र मे महिना संपत आला तरी गंगापूर धरण समूहामध्ये 47 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने सध्यातरी नाशिककरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही. तरीही नाशिककरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी गंगापूर धरण समूहाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान केले आहे.

काटकसरीने पाणी वापरावे लागणार

नाशिक शहरात कोरोनाने थैमान घातले असतानाच, धरण समूहातील पाणीसाठा खालावल्याने लवकरच पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता. मात्र महापौरांनी गंगापूर धरण समूह परिसरात पाहणी दौरा करून याठिकाणी सद्यस्थितीचा आढावा जाणून घेतला आहे. तूर्तास तरी पाणीकपातीची गरज नसल्याचे सांगत नाशिककरांना मोठा दिलासा दिला आहे. ग्रामीण भागात अनेक वाड्या व वस्त्यांवर पाणी टंचाई जाणवत आहे. परिणामी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे धरणांतून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरु आहे. तसेच बाष्पीभवनामुळेही जलसाठा खालावत आहे. मान्सूनचे जूनच्या पहिल्या आठवड्यात आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता मान्सूनच्या आगमनला जुलै अखेर उजाडत आहे. ते बघता उपलब्ध जलसाठ्यावर पुढील दीड महिने जिल्ह्याची तहान भागवावी लागणार असून, अत्यंत काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे.

जिल्हयातील 24 धरणांमध्ये धरणनिहाय जलसाठा

गंगापूर - 47
कश्यपी - 20
गौतमी गोदावरी - 13
आळंदी - 20
पालखेड - 14
करंजवण - 17
वाघाड - 9
ओझरखेड - 25
पुणेगाव - 10
तिसगाव - 7
दारणा - 35
भावली - 38
मुकणे - 27
वालदेवी - 70
कडवा - 20
नांदूरमध्यमेश्वर - 90
भोजापूर - 24
चणकापूर - 38
हरणबारी - 50
केळझर - 35
नागासाक्या - 8
गिरणा - 35
पुनद - 15
माणिकपूंज - 0

अशा प्रकारे जलसाठा आहे.

हेही वाचा - रायगडच्या समुद्रकिनारी सापडले आठ मृतदेह; पी 305 बार्जमधील कर्मचाऱ्यांचे मृतदेह असल्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.