ETV Bharat / state

नाशकात शासन निर्णय झुगारून नाटकांचे प्रयोग सुरूच

या नाटकाला जवळपास ३५० पेक्षा अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे शासन निर्णय झुगारून हे नाटक सुरू आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Theater play in Nashik Even after Theater Closure Decision of Government
नाशकात शासन निर्णय झुगारून नाटकांचे प्रयोग सुरूच
author img

By

Published : Mar 15, 2020, 11:42 PM IST

नाशिक - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने चित्रपटगृह, नाट्यगृह, व्यायामशाळा आणि जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही नाशिकच्या कालिदास नाट्यगृहात रविवारी संध्याकाळी ५.३० वाजता 'विच्छा माझी पुरी करा' या नियोजित नाटकाला सुरुवात झाली आहे.

या नाटकाला जवळपास ३५० पेक्षा अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे शासन निर्णय झुगारून हे नाटक सुरू आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशकात शासन निर्णय झुगारून नाटकांचे प्रयोग सुरूच

दरम्यान हे नाटक संपल्यानंतर काही कलाकरांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर, प्रेक्षकांनी नाटक झाले म्हणून आम्ही बघितले, अशा प्रतिक्रिया दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.