नाशिक - जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बाजार समितीत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. नाशकात गोदावरीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्याशी काही गावांचा संपर्क तुटला होता. परिणामी बाजारसमितीत येणारी भाजीपाल्यांची आवक घटली आहे. यामुळे मेथी, कोथिंबीर, वांगी, दोडके, भेंडी, गिलके यांसह पालेभाज्यांचे दर दुपटीने वाढले आहे.
नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला मुंबईला जातो. त्यामुळे मुंबईमध्ये देखील भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून त्यामुळे येणाऱ्या काळात भाजीपाल्याची आवक वाढून दर कमी होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे.
नाशिक बाजार समितीतील प्रतिकिलो भाज्यांचे आजचे दर...
कोथिंबीर - ६० ते ७० रुपये जुडी
मेथी - ४० ते ५० रुपये जुडी
शेपू - ३० ते ३५ रुपये जुडी
टोमॅटो - ६० ते ७० रुपये किलो
गवार - ८० ते ९० रुपये किलो
वांगी - ५० ते ६५ रुपये किलो
दोडका - ५० ते ५५ रुपये किलो
गिलके - ४९ ते ४५ रुपये किलो
भेंडी - ३० ते ३५ रुपये किलो
वाल- ९० ते १०० रूपये किलो
शेवगा - ८० ते ९० रूपये किलो
मिरची - ९५ ते १२० रूपये किलो