ETV Bharat / state

सप्तशृंगी गडावरील कीर्ती ध्वजाची परंपरा कायम

हा सोहळा गेल्या कित्येक वर्षांपासून पार पडत असून कोविड-१९मुळे भाविकांना गडावर मनाई असल्याने अत्यंत साधेपणाने हा उत्सव पार पडला आहे.

The tradition of Kirti flag on Saptashrungi fort continues after covid
सप्तशृंगी गडावरील किर्ती ध्वजाची परंपरा कायम
author img

By

Published : Oct 24, 2020, 7:46 PM IST

दिंडोरी (नाशिक) - कोरोनामुळे राज्यात सर्व धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. श्री सप्तश्रृंगी भगवती मंदिरदेखील भाविकांना दर्शनासाठी पूर्णत: बंद करण्यात आले आहे. परंतु कीर्ती ध्वजाची परंपरा कायम राहली असून अत्यंत साधेपणाने हा सोहळा पार पडला.

देवी संस्थानचे विश्वस्त अ‌ॅड. ललित निकम, बी. ए. कापसे, तहसीलदार, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या हस्ते या ध्वजाची विधीवत पूजा करण्यात आली. या ध्वजासाठी १० फूट लांब काठी, ११ मीटर केशरी कापडाचा ध्वज, पूजेसाठी गहू, तांदूळ, कुंकू, हळद तसेच झेंडा घेऊन मध्यरात्री १२ वाजता गवळी परिवार शिखरावर जातो. मात्र राज्यातील कोरोनाचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे अत्यंत साधेपणाने सायंकाळी ६;३० वाजता देवी भगवतीच्या मंदिरात पोहचून गवळी परिवार देवीसमोर नतमस्तक होऊन पुढील मार्गासाठी मार्गस्थ झाले.

हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा

सप्तशृंगगड हा समुद्र सपाटीपासून ४५०० फूट उंचीवर आहे. वर्षभरातून चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भगवे निशाण शिखरावर फडकविले जाते. दरेगाव येथील गवळी परिवार हा ध्वज लावण्याचे मानकरी असून गेल्या कित्येक वर्षापासून हा अदभुत सोहळा पार पाडण्याचे काम हे परिवार करीत आहेत. या शिखरावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. सरळ शिखरावर जाणे म्हणेज मुत्यूला आंमत्रण देणे असे आहे. पण कसलीही दुखापत न होता हे कार्य गेल्या कित्येक वर्षांपासून पार पाडत आहेत. हा सोहळा बघणे म्हणेज डोळयाचे पारणे फेडणारा सोहळा असतो. कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे भाविकांना गडावर मनाई असल्याने अत्यंत साधेपणाने हा उत्सव पार पडला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.