ETV Bharat / state

केंद्राने परवानगी दिल्यास सलून व्यवसाय सुरू करण्याची राज्य शासनाची तयारी - छगन भुजबळ - सलून व्यवसाय छगन भुजबळ मत

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने जवळपास सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र, सलून सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळाली नाही. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास राज्यात सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य शासनाची तयारी असल्याचे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ
author img

By

Published : Jun 13, 2020, 8:45 PM IST

नाशिक - कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गेल्या तीन महिन्यांपासून सलून (केशकर्तनालय) व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. व्यवसाय बंद असल्यामुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने जवळपास सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र, सलून सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळाली नाही. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास राज्यात सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य शासनाची तयारी असल्याचे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

राष्ट्रीय नाभिक महासंघ संलग्न महाराष्ट्र नाभिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथे भेट घेतली. नाभिक महासंघाच्यावतीने एक निवेदन भुजबळ यांना देण्यात आले. त्यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सलून व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासन सकारात्मक असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत व्यावसायिकांच्या प्रशाबाबत चर्चाकरून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भुजबळ यांनी दिले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, महाराष्ट्र नाभिक महासंघाचे पदाधिकारी नारायण यादव, अशोक सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, नाना वाघ, गणपत सोनवणे, ज्ञानेश्वर बोराडे, रमेश आहेर, संजय गायकवाड, विनोद गरुड, संतोष वाघ आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या परिस्थितीत गेल्या तीन महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नाभिक समाज त्रस्त झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून नाभिक समाजाचे सलून आणि पार्लर सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी मागणी नाभिक महासंघाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.