ETV Bharat / state

नाशिकच्या 'या' तालुक्यात सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग, तर आदिवासी बहुल सेफ झोनमध्ये

नाशिक शहरासह देवळा, दिंडोरी, चांदवड, निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव या भागात कोरोनाचा उद्रेक अधिक आहे. त्या तुलनेत आदिवासी बहुल भाग असलेल्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचे दिसून आले आहे. सध्या ३८ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Nashik
Nashik
author img

By

Published : Apr 19, 2021, 3:45 PM IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. नाशिक शहरासह देवळा, दिंडोरी, चांदवड, निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव या भागात कोरोनाचा उद्रेक अधिक आहे. त्या तुलनेत आदिवासी बहुल भाग असलेल्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचे दिसून आले आहे. सध्या ३८ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात लोकसंख्येच्या तुलनेत नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोज 4 ते 5 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. तसेच रूग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळणं कठिण झाले आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अडचणीमध्ये आणखीन भर पडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा नाशिक शहरात सर्वाधिक असून पाठोपाठ देवळा, दिंडोरी, चांदवड, निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव या भागात कोरोनाचा उद्रेक अधिक वाढला आहे. त्या तुलनेत आदिवासी बहुल भाग असलेल्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (19 एप्रिल) प्राप्त झालेल्या अहवालानुसार, आतापर्यंत २ लाख ६३ हजार ७७० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी २ लाख २२ हजार ३६८ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ३८ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत २ हजार ९३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण-

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक १ हजार ५५२, चांदवड १ हजार ४८६, सिन्नर १ हजार ४९२, दिंडोरी १ हजार ११८, निफाड २ हजार ९०७, देवळा १ हजार ३३, नांदगांव ८३०, येवला ५९१, त्र्यंबकेश्वर ३५०, सुरगाणा ३०६, पेठ १४३, कळवण ५८३, बागलाण १ हजार ३६०, इगतपुरी ४३३, मालेगांव ग्रामीण ७६७ असे एकूण १४ हजार ९५१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २१ हजार ४२४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ९१८ तर जिल्ह्याबाहेरील १७४ असे एकूण ३८ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ६३ हजार ७७० रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी -

नाशिक ग्रामीणमधे ८१.५० टक्के, नाशिक शहरात ८५.७९ टक्के, मालेगाव मध्ये ७९.१६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.६७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.३० इतके आहे.

मृत्यु -

नाशिक ग्रामीण १ हजार २५९, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३५७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २२९ व जिल्हा बाहेरील ९० अशा एकूण २ हजार ९३५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.