ETV Bharat / state

पेठ तालुक्यातील हरणगाव धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलीपैकी एकीचा मृत्यू

कपडे धुण्यास गेल्या होत्या. त्यानंतर त्या मुली पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरल्या. त्यापैकी एकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ज्योती तुकाराम जाधव (वय 12) असे या मुलीचे नाव आहे.

नाशिक
author img

By

Published : Jun 10, 2019, 2:01 PM IST

नाशिक - पेठ तालुक्यातील आसरबारी जवळील हरणगाव येथील ५ मुली रविवारी सांयकाळी ५ वाजता धरणात कपडे धुण्यास गेल्या होत्या. त्यानंतर त्या मुली पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरल्या. त्यापैकी एकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ज्योती तुकाराम जाधव (वय 12) असे या मुलीचे नाव आहे.

यात बुडालेल्या मुलीचा मृतदेह शोधण्याचे काम रात्री ऊशीरापर्यंत चालू होते. अखेर रात्री नऊच्या सुमारास ज्योतीचा मृतदेह गावातील पट्टीच्या पोहणाऱ्या मुलांनी धरणातून बाहेर काढला. ज्योतीचे वडील तुकाराम जाधव हे कल्याण येथे पोलीस दलात कार्यरत आहेत.

रविवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास आसरबारी येथील धरणात कपडे धुण्यासाठी पाच मुली गेल्या होत्या. कपडे धुवून झाल्यानंतर या पाचही मुली पोहण्यासाठी धरणात उतरल्या. यातील ज्योती जाधव, जयश्री भुसारे, साक्षी भुसारे, अर्चना जाधव, दिक्षा जाधव असे त्यांची नावे आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने यातील ज्योती जाधव तिच्यासह साक्षी भुसारे ही मुलगी पाण्यात बुडाली. योगायोगाने उपस्थित असलेल्या देवानंद गायकवाड या बारा वर्षीय मुलाने साक्षीला पाण्याबाहेर काढले. मुली पाण्यात बुडाल्याची माहिती आसबारी गावात मिळताच अनेकांनी धरणाकडे धाव घेतली.

यातील साक्षी व जयश्री या दिंडोरी तालुक्यातील सादराळे या गावातील रहिवासी होत्या. सुट्टीनिमित्त त्या मामाकडे आल्या होत्या. ज्योतीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कायरे सादरपाडा येथील पट्टीच्या पोहणाऱ्या मुलांना बोलवण्यात आले होते. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी पेठ पोलीस ठाण्याला दिली. रात्री नऊ वाजेच्या सुमारास मृतदेह हाती लागला.

Intro:पेठ तालुक्यातील आसरबारी जवळील हरणगाव येथील धरणात कपडे धुवून झाल्यानंतर पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलीपैकी ज्योती तुकाराम जाधव वय 12 ह्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला

Body:काल पाच वाजेच्या समारास घडलेल्या या घटनेतील बुडालेल्या मुलीचा मृतदेह शोधण्याचे काम काल रात्री ऊशीरा पर्यत्न चालू होते अखेर रात्री 9 सुमारास ज्योतीचा मृत्यदेह गावातील पट्टीच्या पोहणाऱ्या मुलानी धरणातून बाहेर काढला ज्योतीचे वडील तुकाराम जाधव हे कल्याण येथे पोलिस दलात कार्यरत आहे

Conclusion:रविवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास आसरबारी येथील धरणात कपडे धुण्यासाठी पाच मुली गेल्या होत्या कपडे धुऊन झाल्यानंतर या पाचही मुली पोहण्यासाठी धरणात उतरल्या यातील ज्योती जाधव,जयश्री भुसारे,साक्षी भुसारे ,अर्चना जाधव ,दिक्षा जाधव या सर्वांना पाण्याचा अंदाज न आल्याने ज्योती जाधव तिच्यासह साक्षी भुसारे ही मुलगी पाण्यात बुडाली योगायोगाने उपस्थित असलेल्या देवानंद गायकवाड या बारा वर्षीय मुलाने साक्षीला पाण्याबाहेर काढले मुली पाण्यात बुडाल्या याची माहिती आसबारी गावात मिळताच अनेकांनी धरणाकडे धाव घेतली
यातील साक्षी व जयश्री या दिंडोरी तालुक्यातील सादराळे या गावातील रहिवासी होत्या सुट्टीनिमित्त त्या मामाकडे येथे आल्या होत्या ज्योतीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कायरे सादरपाडा येथील पट्टीच्या पोहणाऱ्या मुलांना बोलविण्यात आले होते या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी पेठ पोलीस ठाण्यानाला दिलीय रात्री नऊ वाजेच्या सुमारास मृतदेह हाती लागला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.