हरसूल (नाशिक) - अलीकडे आलिशान शाही लग्नाची नवी परंपरा सुरु होत असताना पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून वऱ्हाड नेण्यात ( groom reached in bullock cart in nashik ) आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ एक दोन नाही तर तब्बल 10 बैलगाड्यांतून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील हरसूल येथून निघालेले हे वऱ्हाड 12 किमीवरील शिरसगावला पाच तासांत लग्न कार्यालयात पोहोचले.
10 बैलगाड्यांमधून लग्नाचं वऱ्हाड - हरसूल येथील शेतकऱ्याने आपल्या विवाहाचे मुलाच्या वऱ्हाड आलिशान गाड्यांऐवजी पारंपरिक पद्धतीने आदिवासी सजविलेल्या 10 बैलगाड्यांमधून नवरीच्या गाव शिरसगाव येथे वाजत गाजत नवरदेवाने बैलगाडी स्वतः हाकत वऱ्हाडी मंडळींना लग्नाच्या ठिकाणी पोहचवले. हरसूल येथील पुंडलिक कनोजे यांचे चिरंजीव पद्माकर व शिरसगाव येथील मोहन साबळे यांची कन्या विजया यांचा शुभविवाह दि. 27 एप्रिल रोजी होता.
जुन्या चालीरीतीना उजाळा - बैलगाडी नामशेष होत चालली असताना मित्र व नातेवाइकांमार्फत जास्तीत जास्त बैलगाड्या शोधून त्यांची रंगरंगोटी सजविण्यात करून आल्या. खिल्लारी जोडीचे बैल शोधून तयारी पूर्ण केली. प्रत्येक बैलगाडीला ताटी लावण्यात आली होती. याचबरोबर बैलांना पोळ्याप्रमाणे रंगरंगोटी करून सजविण्यात आले होते. जुन्या आदिवासी चालीरीतीच्या आठवणींनीना उजाळा मिळाल्याने बैलगाडी हरसूल भागात चर्चचा विषय ठरला आहे. शिरसगावकडे वऱ्हाड रवाना झाले प्रसंगी त्र्यंबकेश्वर इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित नवरदेवाच्या बैलगाडीचे सारथ्य करत होत्या.