ETV Bharat / state

Teachers car accident : शाळेत साहेब आल्याचे कळताच वेगात निघालेल्या 'त्या' शिक्षिकांच्या गाडीला अपघात तीघी जखमी - Government Girls Ashram School

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील शासकीय कन्या आश्रम शाळेत चौकशी साठी आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी आल्या (Saheb has come to school) म्हणून,शाळेतील कर्मचाऱ्यांची चांगली धावपळ उडाली, नाशिकहून देवगाव शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेंच्या (The accident of the teachers car) भरधाव वाहनाचा (driving at high speed) घोटी नजीक अपघात झाला, यात या तीन शिक्षिका जखमी ( three teachers were injured) झाल्या असून त्यांच्यावर घोटी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Teachers car accident
शिक्षिकेच्या गाडीचा अपघात
author img

By

Published : Jul 27, 2022, 1:08 PM IST

नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील शासकीय कन्या आश्रम शाळेत (Government Girls Ashram School) शिक्षकाने मासिक पाळी असल्याने एका विद्यार्थिनीला झाड लावण्यास मजाव केल्याची धक्कादायक घटना समोर आली. 'ईटीव्ही भारत'ने हा प्रकार समोर आणला त्या नंतर अदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी शिक्षकांची समिती नेमून या प्रकरणा चौकशी करण्याचे आदेश दिले, याची दखल घेत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वर्षा मीना आज सकाळी आश्रम शाळेत चौकशीसाठी दाखल झाल्या. यावेळी शाळेतील शिक्षकांची चांगलीच धावपळ उडाली, शाळेत अधिकारी आले म्हणून नाशिक हुन भरधाव वेगाने निघालेल्या शिक्षिकेंच्या वाहनाचा त्र्यंबकेश्वर येथे अपघात झाला, (The accident of the teachers car) वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली, या अपघातात कवितां बेडकोळी, नवले, सूर्यवंशी या तिन् शिक्षिका जखमी झाल्या असून त्यांना घोटी येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

असे होते प्रकरण: एकीकडे भारत देश आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धा बघायला मिळत आहे.अशीच एक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील शासकीय कन्या आश्रम शाळेत घडली, शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान शिक्षक आर टी देवरे यांनी अजब फतवा काढत, ज्या मुलींना मासिक पाळी आहेत त्यांनी झाड लावू नये, मागच्या वेळेस झाडे जगली काही, असे म्हणत त्यांनी अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला झाड लावण्यास मज्जा केला, शिक्षकाच्या या वर्तणुकीमुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते.

ग्रामीण भागात अजून आहे अंधश्रद्धा : ग्रामीण भागात आजही अनेक अंधश्रद्धेचे प्रकार बघायला मिळतात, जादू टोना , पैशाचा पाऊस, दरवाजाला लिंबू मिरची लावणे, साप मारल्यावर त्याचे तोंड ठेचने, रात्री नख न कापणे, इच्छापूर्ती साठीनदीत पैसे टाकणे, या यासारख्या अनेक अंधश्रद्धा आजही ग्रामीण भागात बघायला मिळतात..

परीक्षेला बसू देणार नाही : मागच्या वर्षी आपण शाळेत वृक्षारोपण केले होते,मात्र ती झाडे जगली नाही,आता आपण पुन्हा वृक्षारोपण करत आहोत,मात्र यंदा ज्या मुलींना मासिक पाळी आहे त्यांनी वृक्षारोपण करू नये,असे म्हणत त्यांनी मला झाड लावू दिले नाही. याबाबत मी त्यांना विचारले तर तू जास्त बोलते असं म्हणत 12 च्या परीक्षेत तुला कमी मार्क दिल असे मला धमकावले, आश्रम शाळेत अनेक समस्या आहेत.नाष्टा व जेवण चांगले मिळत नाही,शाळेत विद्यार्थ्यांनिन कडून साफसफाई करण्याचे काम करून घेतात, अंघोळी साठी गरम पाणी मिळत नाही अशा अडचणींना आम्हा मुलींना सामोरे जावं लागत आहे असे त्या विद्यार्थ्यांनीने सांगितले होते.

हेही वाचा : Pune Farmers : पुणे जिल्ह्यातला शेतकरी झाला आधुनिक, पिकांवरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.