नाशिक : नाशिकच्या सारडा सर्कल येथे नव्याने स्पिरीट झोन हे दारू विक्री दुकान सुरू करण्यात आले आहे. अशात या दुकानाच्या जवळच शाळा, मंदिर, दर्गा, विद्यार्थ्यांचे क्लासेस असल्याने हे दारू दुकान त्वरित हटवावे अशी मागणी करत, उद्धव सेनेच्या महिला पदाधिकारी यांनी आंदोलन केले. दारू दुकान बंद करा असे बॅनर हातात घेत घोषणाबाजी करण्यात आली. अनेकदा निवेदन देऊनही दारू दुकान बंद होत नाही. पुढील दहा दिवसात दुकान बंद झाले नाही तर, शिवसेना स्टाईल आंदोलन करून असे महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर आंदोलनावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी, मोठा पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.
शिवसेना स्टाईल आंदोलन करू : सारडा सर्कल हा रहदारीचा रस्ता आहे. ज्या ठिकाणी नव्याने दारू दुकान सुरू करण्यात आले आहे. त्या दुकानाच्या मागील बाजूस मंदिर आहे. तसेच या कॉम्प्लेक्समध्ये वरच्या बाजूस विद्यार्थिनींचा क्लास आहे, बाजूला शाळा आहे. अशात हे दुकान सुरू झाल्यावर या ठिकाणी मद्यपींची मोठी गर्दी होते. ग्राहक रस्त्यावर गाडी लावत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याबाबत शिवसेनेन अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र त्यावर कारवाई होत नाही, त्यामुळे आज आंदोलन करण्यात आले आहे, पुढील दहा दिवसात दुकान बंद झाले नाही तर, शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
कारखान्यावर टाकला छापा : याआधी चंद्रपूर येथे बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला होता. या कारवाईत दारूचा साठा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आले होते. रवींद्र उर्फ बिट्टू कंजर असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा -