ETV Bharat / state

निवडणूक खर्चावर आयकर विभागाची नजर; २४ मतदारसंघावर नोडल ऑफीसरची नियुक्ती - लोकसभा

नेत्यांचे खासगी चॉपर्स आणि विमानांवर आयकर विभाग लक्ष ठेवणार आहे. यासाठी २८ जणांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. नोडल ऑफीसर आणि व्हेरिफिकेशन ऑफीसरची नियुक्ती केली जाणार आहे

आयकर विभागाचे मुख्य संचालक जयराज काजला
author img

By

Published : Mar 23, 2019, 12:48 PM IST

Updated : Mar 23, 2019, 1:01 PM IST

नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या खर्चावर आयकर विभागाला नजर ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार, आयकर विभाग सर्व पक्षांच्या पैशांच्या व्यवहारावर लक्ष ठेवणार आहे. काही अनुचित प्रकार आढळून आल्यास सेल टॅक्स आणि एक्साईज विभाग संयुक्तरित्या कारवाई करतील. आयकर विभागाकडून २४ मतदारसंघात नोडल ऑफीसर नियुक्त करण्यात आले आहेत.

पैशांचा दुरुपयोग होऊ नये यासाठी आयकर विभाग लक्ष ठेवणार असल्याचे काजला म्हणाले

नेत्यांचे खासगी चॉपर्स आणि विमानांवर आयकर विभाग लक्ष ठेवणार आहे. यासाठी २८ जणांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. नोडल ऑफीसर आणि व्हेरिफिकेशन ऑफीसरची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच, एअर सर्विलन्स केले जाणार आहे. विमानतळावरही यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे. आयकर विभागाचे मुख्य संचालक जयराज काजला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

१४ मतदारसंघासाठी न्यायक्षेत्रीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. चोवीस तास काम करणारा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. २४ मतदारसंघ आणि ६ विमानतळावर आयकर विभाग लक्ष ठेवणार आहे. यात गोंदिया, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, नागपूर, नांदेड यांचा समावेश आहे. नागरिकांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी १८००२३३३७८५ या टोल फ्री क्रमांकावर, ९४०३३९१६६४ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर, तसेच ०७१२२५२५८४४ या फॅक्स क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.

REPORTER NAME :-RAKESH SHINDE

लोकसभा निवडणुकीत खाजगी हवाई वाहतूकीवर आयकर विभागाची नजर....

नाशिक :-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने आयकर विभागाला सक्रिय केले आहे. त्यामुळे राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या पैशांच्या व्यवहारावर आयकर विभागाची नजर असणार आहे.  सेल टॅक्स विभाग आणि एक्साईज विभाग यांच्या सोबत ही संयुक्त कारवाई होणार आहे

यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  कार्यकर्त्यांवर आयकर विभागाची नजर असणार आहे. नेत्यांच्या खाजगी चॉपर्स आणि विमानांवरही आयकर विभाग लक्ष ठेवून असणार आहे. 24 लोकसभा मतदारसंघावर नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 28 जणांचे पथक तैनात याठिकाणी तैनात करण्यात येत आहे. नोडल ऑफिसर आणि व्हेरिफिकेशन ऑफिसरची नियुक्तीही केली जाणार आहे. तसेच एअर सरविलन्स केले जाणार आहे. विमानतळावरही यंत्रणा सतर्क असणार असेही यावेळी सांगण्यात आले आहे.  

14 मतदारसंघांसाठी नाशिक यांना न्यायक्षेत्रीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, ज्यामध्ये निवडणूक प्रक्रिया 23 आणि 4 ए टप्प्यात होणार आहे. वरीलपैकी 24x7 नियंत्रण कक्ष, आयकर (तपासणी), नागपूर येथील प्रधानाचार्य कार्यालयामध्ये स्थापित करण्यात आला आहे. नियंत्रण कक्ष 24 मतदारसंघ आणि सहा विमानतळ सेवा गोदिया औरंगाबाद
जळगाव, नाशिक, नागपूर आणि नांदेड अशा एकूण सहा विमानतळांवर आयकर विभागाचे लक्ष असणार आहे. याबद्दल कोणाकडे अधिक माहिती असल्यास टोल फ्री नंबर 1800 233 3785 व्हॉट्सअँप नंबर 9403391664, फॅक्स नंबर 07122525844 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयकर विभागाचे जयराज काजला प्रधान सचालक यानी नाशिक मध्ये  पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली आहे. 

Bite:_जयराज काजला प्रधान सचालक आयकर विभाग
मुंबई

टिप :-व्हिडिओ ftpपाढविले आहेत...या नावाने
1)MH_Nsk_bite.Jairaj Kajla income tex.mp4
2)MH_nsk_vio.1.income tex press .mp4
3)MH_nsk_vio.2.income tex press .mp4
3)MH_nsk_vio.3.income tex press .mp4
Last Updated : Mar 23, 2019, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.