ETV Bharat / state

मालेगावातून एकाच वेळी तब्बल 40 तलवारी जप्त, तिघे ताब्यात

ग्रामीण पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर मालेगावजवळ एका वाहनातून येणारा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये 40 तलवारी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

nashik crime
मालेगावातून एकाच वेळी तब्बल 40 तलवारी जप्त, तिघे ताब्यात
author img

By

Published : Dec 3, 2020, 12:40 PM IST

नाशिक - ग्रामीण पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर मालेगावजवळ एका वाहनातून येणारा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. संबंधित वाहनातून तब्बल 40 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

मालेगावातून एकाच वेळी तब्बल 40 तलवारी जप्त, तिघे ताब्यात

पवारवाडी हद्दीतील हॉटेल मिड्डेजवळ एका वाहनातून शस्त्र मालेगावात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. त्यातून 40 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तर तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. हा शस्रसाठा कुठून आला होता,आणि नेमका कुठे घेऊन जात होता, यासंदर्भात अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

मोहम्मद आसिफ शाकिर अहमद (वय २७, रा. मर्चट नगर, मालेगाव), इरफान अहमद हबीब अहमद (वय ३८, रा. मर्चट नगर, मालेगाव) व आतिक अहमद सलिम अहमद (वय २८, रा. इस्लाम पुरा, मालेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नवे आहेत.

तर मोहम्मद मेहमुद अब्दुल राशिद अद्याप फरार आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रसाठा सापडल्याने मालेगाव परिरात खळबळ उडाली आहे. या तलावारी परराज्यातून आणण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यांचा वापर काही घातपातासाठी केला जाणार होता का? याविषयी पोलीस तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.