नाशिक - जलसंपदा विभागाचे (सिडीओ) धरण मंडळाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौघुले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निसर्ग नगर म्हसरूळ येथील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. मधुमेहाच्या आजाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले अशी, प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मात्र, अजूनही नेमके कारण अस्पष्ट आहे. चौघुले हे मूळचे पंढरपूरचे आहेत. यांनी घरातील खिडकीला लुंगीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह नाशिकच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.