ETV Bharat / state

नाशिकमध्ये 'सुला फेस्ट'; वाईन एज्युकेशनसह प्रसिद्ध कलाकारांच्या संगीतावर थिरकणार तरुणाई - sula fest wine education

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून सकारात्मक पाऊल उचलत प्लास्टिक बॉटल व अन्य कचरा टाकण्यासाठी व्हेंडींग मशीन उपलब्ध असणार आहे. तसेच फेस्टमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती मागे एका झाडाचे वृक्षारोपण करणार असल्याचे सुला फेस्टच्या आयोजकांनी सांगितले. एकूणच विकेंड अधिक रंजक बनवण्यासाठी वाईन प्रेमींसाठी सुला फेस्ट एक पर्वणीच असणार आहे.

nashik
सुला फेस्ट
author img

By

Published : Jan 23, 2020, 2:58 PM IST

Updated : Jan 23, 2020, 3:08 PM IST

नाशिक - शहरात १ आणि २ फेब्रुवारीला सुला फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. या सुला फेस्टमध्ये पहिल्यांदाच वोनो विनोस्फियरमध्ये वाईनचे शिक्षण दिले जाणार आहे. गंगापूर रोडवरील सुला वाईन यार्डमध्ये या फेस्टचे आयोजन करण्यात येणार असून यात जगातील प्रसिद्ध कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहे. या फेस्टमध्ये देशभरातून येणाऱ्या वाईन प्रेमींना वाईन सोबत संगीताच्या तालावर थिरकता येणार आहे.

सुला फेस्टबद्दल माहिती देताना सुला वाईन यार्डचे मॅनेजर मोहित ढवळे

वाईन कॅपिटल सिटी म्हणून नाशिकची ओळख आहे. येथे होणारा सुला फेस्ट म्हणजे देशभरातील वाईन प्रेमींसाठी पर्वणीच असतो. या दोन दिवसीय महोत्सवात जगभरातील संगीतकार रसिकांच्या भेटीस येणार आहेत. भारतात आपले पहिले सादरीकरण करणाऱ्या ब्रिटिश चार्ट टॉपर त्याचबरोबर हिप हॉपच्या तालावर थिरकण्याचा कुणालाही मोह आवरता येणार नाही.

नाच गाण्यासह खाद्यापदार्थांचे असतील भरपूर पर्याय

'रब ने बनादी जोडी', 'मुझसे शादी करोगी', 'धूम' अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात संगीत दिलेल्या मर्चंट बंधू अर्थात सलीम-सुलेमान यांची जोडी बॉलिवूड तडका कलावंतांना सुला फेस्टमध्ये बघायला मिळणार आहे. यासोबतच फ्रान्स, इटली, अमेरिका, जर्मनी, युके, स्वीडन, रशिया येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कलाकारही या फेस्टमध्ये सादरीकरण करणार आहेत. या भव्य महोत्सवात चविष्ट खाद्यपदार्थांचे भरपूर पर्याय उपलब्ध राहणार आहेत. यात प्रामुख्याने सोडा बॉटल ओपनरवाला यांच्यातर्फे लज्जतदार पदार्थांनां सुलाच्या चविष्ट वाईनची जोड दिली जाणार आहे. 'द ऑलिव्ह कॅफे' यांच्या तर्फे पेरिंगचे पर्याय सुचवले जाणार आहे.

सोबत अनेक खाद्यपदार्थचे स्टॉल राहणार आहेत

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून सकारात्मक पाऊल उचलत प्लास्टिक बॉटल व अन्य कचरा टाकण्यासाठी वेंडींग मशीन उपलब्ध असणार आहे. तसेच फेस्टमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती मागे एका झाडाचे वृक्षारोपण करणार असल्याचे सुला फेस्टच्या आयोजकांनी सांगितले आहे. एकूणच विकेंड अधिक रंजक बनवण्यासाठी वाईन प्रेमींसाठी सुला फेस्ट एक पर्वणीच असणार आहे.

हेही वाचा- नाशिकमध्ये वर्षभरात १५८ गुन्हेगार तडीपार, आणखी २३८ गुन्हेगार रडारवर

sample description
Last Updated : Jan 23, 2020, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.