ETV Bharat / state

सुधाकर बडगुजर यांची अटक टळली, एसीबीकडून आठ दिवसांची मुदत

Sudhakar Badgujar Case : उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर त्यांच्या विरोधात नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात महानगरपालिकेत सत्तेचा (Sudhakar Badgujar arrest averted) दुरुपयोग करून शासनाची 33 लाख 68 हजाराची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यता होती. पण, त्यांना एसीबीने काही कागदपत्रं सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिलीय. त्यामुळे त्यांची अटक टळली.

Sudhakar Badgujar Case
सुधाकर बडगुजर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 6:24 PM IST

एसीबी चौकशी प्रकरणी माहिती देताना सुधाकर बडगुजर

नाशिक Sudhakar Badgujar Case : शासनाच्या फसवणूक प्रकरणाचा तपास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत असून आज बडगुजर यांची एसीबीच्या कार्यालयात तब्बल पावणे दोन तास चौकशी झाली. (Nashik ACB Department) या प्रकरणात बडगुजर यांना अटक होण्याची शक्यता असताना आज त्यांना एसीबीने काही कागदपत्रं सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षीका शर्मिला वालावलकर यांनी सांगितलं. (Sudhakar Badgujar interrogated by ACB)

काय आहे प्रकरण? - सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात दिलेल्या पत्राच्या आधारे एसीबी कडून चौकशी सुरू होती. या पत्रात बडगुजर अँड बडगुजर कंपनीतून 2006 मध्ये निवृत्ती घेतल्या बाबत खोटी कागदपत्रे बनवली. मनपामध्ये 2007 पासून नगरसेवक व इतर पदे भूषवताना बडगुजर कंपनीला मनपाकडून विविध कंत्राटं देत कंपनीच्या माध्यमातून 2007 ते 2009 या कालावधीत 33 लाख 69 हजार रुपये घेत आर्थिक फायदा केला. तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात बडगुजर हे शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग करत स्वतःच्याच कंपनीला कंत्राटं दिल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. गेडाम यांच्या तक्रारीनुसार एसीबीकडून बडगुजर अँड बडगुजर या कंपनीची चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल काही दिवसापासून गुलदस्त्यात असतानाच, एसीबीनं 17 डिसेंबर ला रात्री उशिरा सरकारवाडा पोलिसात बडगुजर यांच्यासह तिघां विरोधात पदाचा दुरुपयोग करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. यामध्ये बडगुजर यांच्यासह त्यांचे साथीदार सुरेश भिका चव्हाण, साहेबराव रामदास शिंदे यांचा समावेश आहे..

काही उत्तरांसाठी वेळ मागितला : बडगुजर यांनी ACB ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. कोर्टाच्या निकालाची कॉपी ACB ला दिली आहे. आणखी काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी वेळ मागितला आहे. 10 जानेवारीला पुन्हा चौकशीला बोलावलंय असं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं.

प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होतोय : आज सुधाकर बडगुजर यांची चौकशी केली. त्यांनी काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिलेली नाहीत. अजून प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांना काही कागदपत्रे मागवायची असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यासाठी त्यांना थोडा वेळ हवाय. आम्ही त्यांना साधारणपणे 8 दिवसांची मुदत देतोय. प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होतोय. कंपनीच्या माध्यमातून बडगुजर यांचे 6 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर येतेय. त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ दिलाय असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिला वालावलकर यांनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. जिल्हा मध्यवर्ती बँक शेअर्स घोटाळा; माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्ष सक्त मजुरी आणि साडेबारा लाखाचा दंड
  2. मुंबईची लूट दिल्लीश्वरांच्या आदेशाने, आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टीका
  3. 'जितेंद्र आव्हाड स्टंटबाज', चंद्रशेखर बावनकुळेंची जोरदार टोलेबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.