ETV Bharat / state

तीन वर्षांपासून मंदिरात बसून चिमुरडे घेत आहेत शिक्षण - तांबेवाडी न्यूज

तांबेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या अर्ध्या भागातील स्लॅब पूर्णपणे गायब झाला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी ऊन-वारा-पाऊस यांचा सामना करत शिक्षण घेत होते. शेवटी हा त्रास असह्य झाल्याने गावातील विठ्ठल-रुक्मिणी, मारूती मंदिरात काही वर्ग भरवण्यात येत आहेत.

मंदिरात बसून चिमुरडे घेत आहेत शिक्षण
मंदिरात बसून चिमुरडे घेत आहेत शिक्षण
author img

By

Published : Jan 15, 2020, 8:21 PM IST

Updated : Jan 16, 2020, 5:49 PM IST

नाशिक - नांदगाव तालुक्यातील तांबेवाडीच्या विद्यार्थ्यांवर मंदिरात शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. शाळेला इमारत नसल्याने मागील तीन वर्षांपासून तांबेवाडीची शाळा मंदिरात भरत आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही त्यांनी काहीच कारवाई केलेली नाही.

मंदिरात बसून शिक्षण घेणारी मुले

तांबेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या अर्ध्या भागातील स्लॅब पूर्णपणे गायब झाला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी ऊन-वारा-पाऊस यांचा सामना करत शिक्षण घेत होते. शेवटी हा त्रास असह्य झाल्याने गावातील विठ्ठल-रुक्मिणी, मारूती मंदिरात काही वर्ग भरवण्यात येत आहेत. गावाच्या समाज मंदिरात काही वर्ग आणि एक वर्ग शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षाच्या घरी भरत आहे.

हेही वाचा - लष्कर दिन: सरसेनाध्यक्षांसह तिन्ही सेनादल प्रमुखांनी युद्ध स्मारकाला वाहिली आदरांजली

मागील तीन वर्षांपासून शाळा समिती, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी शाळेच्या इमारतीसाठी लेखी-तोंडी पाठ पुरावा केला. मात्र, प्रशासनाने आणि लोक प्रतिनिधींनी याची दखल घेतली नाही. अजून किती दिवस हा त्रास सहन करायचा? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या विभागाला गट शिक्षणाधिकारीही नाहीत. तांबेवाडी शाळेच्या इमारतीसाठी मुख्यध्यापकांमार्फत शिक्षण विभागाकडे मागणी केली आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ नवीन वर्ग खोल्या बांधल्या जातील, असे प्रभारी गट शिक्षणाधिकारी एन जी ठोके यांनी सांगितले.

Intro:नांदगांव:सध्याच्या स्पर्धेच्या युगात आधुनिक अध्यापन पध्दती व दर्जेदार शैक्षणिक साहित्य ,इ लर्निंग यासारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण दिले जाते.यात जिल्हा परिषदेच्या शाळा देखील मागे नाहीत परंतु तालुक्यातील तांबेवाडीच्या 103 विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींपासुन वंचित राहून मंदिरात आणि उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली थोडेफार नाही तर तब्बल तीन वर्षांपासून तांबेवाडीची शाळा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात भरत आहे.याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून आमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत लवकरात लवकर शाळेचे वर्ग उपलब्ध करून देण्याची मागणी पालक ग्रामस्थ यांच्यासह शिक्षकांनीही केली आहे.Body:नांदगांव तालुक्यातील तांबेवाडी हे गाव सध्या चर्चेचा विषय ठरत असुन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची झालेली दुरवस्था व यामुळे मंदिरात भरणारे शाळेचे वर्ग हा चर्चेचा विषय ठरत असुन गेल्या तीन वर्षांपासून येथील शाळेची इमारत मोडकळीस आली आहे तर अर्ध्या भागातील स्लॅब पूर्णपणे गायब झालेला आहे यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना ऊन वारा पाऊस यांचा सामना करत शिक्षण घेण्याची वेळ आली आहे असाह्य झाल्यानंतर शाळेजवळील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात तर काही वर्ग गावाच्या समाज मंदिरात तर एक वर्ग शालेय समितीचे अध्यक्ष यांच्या घरी भरत असुन यासाठी गेले तीन वर्षांपासून शालेय समिती ग्रामस्थ तसेच शिक्षक यांनी लेखी तोंडी पाठपुरावा करून देखील प्रशासन दखल घेत नसल्याने सर्वजण हतबल झाले आहेत.सध्या येथे एक षटकोनी वर्ग आहे त्यातच या ठिकाणी जवळपास 103 पटसंख्या असुन पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरतात आहे त्या इमारतीची अत्यांत दुरवस्था झालेली असुन अर्ध्या इमारतीचा स्लॅब नाही त्यामुळे ऊन वारा पाऊस याचा त्रास होता यावर उपाय म्हणून शालेय शिक्षक व ग्रामस्थांनी मार्ग काढत सध्या शाळा गावाच्या मंदिरात भरवली मात्र अजून किती दिवस हा त्रास सहन करायचा असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला असुन गेल्या तीन वर्षांपासून आम्ही प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे शाळेच्या वर्गाची मागणी करत आहोत मात्र कोणीही याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.Conclusion:याआधी येथे एकच शिक्षक उपलब्ध होता पहिले ते चौथी पर्यंत तोच शिक्षक शिकवत होता मग ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकल्यानंतर इतर शिक्षक रुजू झाले मात्र वर्ग एकच असल्याने मोठी अडचन निर्माण झाली त्यावर उपाय सुरू होतो ना होतो तोच शाळेची इमारत मोडकळीस आली म्हणजे या ना त्या कारणांने येथील मुलांना शालेय शिक्षण घेण्यासाठी अडचणच निर्माण होत असते यासाठी वेळोवेळी ग्रामस्थांनी तसेच शालेय समितीच्या सदस्यांनी शासन दरबारी निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची सुधारणा तसेच मदत मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गटशिक्षणाधिकारी उपलब्ध नसल्याने प्रभारी असलेल्या ठोके मॅडम यांच्याशी चर्चा केली असता यु डायस प्रमाणे मागणी केलेली आहे निधी उपलब्ध झाल्यावर नवीन वर्ग व नुतनीकरण करण्यात येईल.असे उत्तर दिले आहे.
आमिन शेख मनमाड- नांदगांव (नाशिक)
Last Updated : Jan 16, 2020, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.