नाशिक - नाशिक जिलह्यात अपघातांच्या संख्येवर नियंत्रण आणले. तसेच अपघातामुळे होणारे मृत्यु, गंभीर दुखापत, किरकोळ दुखापत कमी करण्यासाठी पथदर्शी उपक्रम म्हणून राज्य रस्ता सुरक्षा कक्षाने नाशिक जिल्ह्याची निवड केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर ३३ % अपघात
राज्य रस्ता सुरक्षा कक्षाने नाशिक जिल्हयातील झालेले अपघात व त्यावर करण्याच्या उपाययोजना या संदर्भात सूचना केलेल्या आहेत. यामध्ये नाशिक जिल्हयातील ब्लॅकस्पॉटची संख्या, रस्त्यांचा प्रकार पहाता राष्ट्रीय महामार्गावर ३३ % अपघात होत आहेत. तर इतर मार्गावर सुमारे ५०% अपघात होत आहेत.
अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे जास्त अपघात
राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व अंतर्गत रस्त्यांवर दुपारी ४ ते ८ (२० %) व रात्री ८ ते १२ (२२ %) कालावधीत अपघातांचे प्रमाण जास्त आढळून येते. अपघातांच्या कारणांसंबंधी विश्लेषण केले असता अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे सर्वात जास्त म्हणजेच ७१ % अपघात झाल्याचे दिसून येत आहे. आणि हे दुचाकीतच झाले आहे. अपघातांची आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन नियोजन व अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचही नाशिकचे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.
अपघातांचे प्रमाण कमी झाले
नाशिक जिल्हयातील गेल्या ५ वर्षात ४८ टक्के अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. या अपघातांमध्ये एका वर्षात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण हे ९८७ वरुन ९५४ वर आले आहे. नाशिक जिल्हयातुन मुंबई -आग्रा नाशिक - पुणे हे दोन महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असते. वेग मर्यादेचे उल्लंघन करुन अति वेगाने धावणारी वाहने हे एक प्रमुख कारण असल्याचेही कळसकर त्यांनी यावेळी सांगितले. तसेच वेग नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नवीन वाहनांचा समावेश करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - मुंबईत झोपडपट्ट्यापेक्षा इमारतींमध्ये कोरोना रुग्ण