नाशिक - राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा निर्मित तब्बल 14 लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. कुरीयरच्या सिल बंद ट्रॅकमध्ये विदेशी दारू आणि बियरचा लाखो रुपये किंमतीचा साठा चोर मार्गाने महाराष्ट्रात आणि गोव्यात विक्रीसाठी नेत असताना नाशिकच्या उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. तर दारु तस्कीरीचा हा प्रकार कोणाच्या माध्यमातून सुरु होता याचा शोध पोलीस घेत आहेत.
राज्य उत्पादन शुल्कने द्वारका सिग्नल येथे अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे. या वाहनातून गोवा येथे तयार केलेला १४ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुळचा राजस्थान येथील रहिवाशी असलेला वाहनचालक बिश्नोई याला ताब्यात घेतले आहे. द्वारका मार्गे मद्य नेणारे वाहन धुळे येथे जात होते. लाॅकडाऊन शिथील झाल्याने अवैध मद्यसाठा वाहतुकीत वाढ झाली आहे. उत्पादन शुल्कने १४ लाखांचे मद्य व दहा लाखांचे वाहन असे एकूण २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा - Amravati Crime News : गुलिस्तानगरमध्ये दोघांवर चाकूने हल्ला; एकाचा मृत्यू