नाशिक - नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून लाखोंचा अवैद्य मद्य साठा जप्त केला आहे. अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाण सध्या वाढल्याचे दिसून येत आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही अवैध मद्य वाहतूक (Illegal liquor smuggling ) वाढली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील या अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. सहा लाखाची तब्बल ११२ बॉक्स आणि पिकअप गाडी असा जवळपास पंधरा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा -TET Exam Scam : दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी मिळाले घबाड.. 2 कोटीहून अधिक रोखड व सोने जप्त
या अवैध दारू तस्करांनी गाडीच्या मागे टोमॅटोचे कॅरेट ठेवून आतमध्ये दारू विक्रीसाठी आणली होती. मात्र गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्र्यंबकेश्वर तळवाडे ग्रामीण भागातून ही कारवाई केली आहे.