ETV Bharat / state

कडक निर्बंध : येवला आगाराच्या उत्पन्नावर परिणाम

कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येत आहे. मात्र, येवला आगारातील सर्व कर्मचाऱ्यांना लस देण्याची मागणी आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी केली आहे. 45 वर्षांवरील सर्वांनी लस घेतली आहे. मात्र, 45 पेक्षा कमी वय असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे त्यांनाही लस देण्यात, यावी अशी मागणी गुंड यांनी केली आहे.

एसटी
एसटी
author img

By

Published : Apr 22, 2021, 7:13 PM IST

Updated : Apr 22, 2021, 7:25 PM IST

येवला (नाशिक) - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच धावणार, असे स्पष्ट केले आहेत. यामुळे एसटीचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. येवला एसटी आगाराचे प्रतिदिन सुमारे 3 ते 5 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे, अशी माहिती आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली.

बोलताना आगार प्रमुख

येवला एसटी आगाराच्या 46 बसेस दररोज राज्यातील विविध शहरात बसेस जातात. आगारात 96 चालक, 81 वाहक व 23 चालक कम वाहक आहेत. वर्कशॉपसह सुमारे 220 कर्मचारी येथे कार्यरत आहेत. मात्र, कडक निर्बंधामुळे केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी धावणार आहे.

हेही वाचा - एसटी केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच अनिल परब यांचे स्पष्टीकरण

Last Updated : Apr 22, 2021, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.