ETV Bharat / state

कोरोनाचा फटका; यंदाच्या अक्षय तृतीयेला कुंभाराचा 'घडा' राहिला 'रिकामा' - अक्षय तृतीया

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा सण उद्या आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने १२०० ते १५०० केळीचे नग विकले जातात. यंदा मात्र १०० ही विकले गेले नसल्याने मोठी आर्थिक अडचण झाली आहे.

kel
माठ विकताना दाम्पत्य
author img

By

Published : Apr 25, 2020, 6:46 PM IST

Updated : Apr 25, 2020, 8:27 PM IST

नाशिक - लोकांची थंड पाण्याची तहान भागवणाऱ्या कुंभाराचा घडा मात्र यंदा आखजीच्या (अक्षय तृतीया) सणाला रिकामाच राहिला आहे. अक्षय तृतीयेला तब्बल १५००चे आसपास छोटे माठ विकणाऱ्या कुंभारांकडे यंदा मात्र ग्राहक फिरकलेच नाही. केवळ पन्नास ते शंभरच्या आसपास केळी विकली गेल्याने कुंभार व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत.

कोरोनाचा फटका; यंदाच्या अक्षय तृतीयेला कुंभाराचा 'घडा' राहिला 'रिकामा'

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा सण उद्या आहे. या सणाला छोटे माठ केळीला पूजण्याचा मोठा मान असतो. मात्र संचारबंदीमुळे कुणीही घराबाहेर पडत नसल्याने लाखो रुपये खर्च करून तयार केलेला माल व विक्रीसाठी आणलेला माल तसाच पडून आहे. त्यामुळे कुंभार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपले वाडवडील व पितृ यांना नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. याचबरोबर घरात केळीचे पूजनही याच दिवशी केले जाते. कुंभार व्यावसायिकांसाठी हा सण म्हणजे कमाई करण्याचे सिझन मानले जाते. यंदा मात्र सगळीकडे कोरोनासोबतची लढाई लढतांना सर्वत्र संचारबंदी सुरू असताना नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा नसल्याने या सगळ्यांचा फटका कुंभार व्यावसायिकांना बसला. तब्बल तीन महिने अगोदरपासून अक्षय तृतीया या सणाची तयारी सुरू करावी लागत असून त्या दृष्टीने लाखो रुपये खर्च करून 'केळी' माल बनवून तयार ठेवला जातो. मात्र यंदा माल असूनही मागणी नसल्याने हातावर पोट असलेल्या कुंभार व्यावसायिकांची मोठी अडचण झाली आहे. अक्षय तृतीयेला गावोगावी खेड्यावर जाऊन विकलेल्या मालावरच पुढील सण उत्सव यांचे गणित ठरलेले असते. मात्र यंदाचा केळीचा सिझन कोरोनामुळे सपशेल फेल गेला आहे. लग्नसराईत लागणारे माठ, उन्हाळ्यात थंड पाणी तयार होण्यासाठी तयार केलेले मडके याची सुद्धा मागणी कमी झाली. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील ४० हुन अधिक कुंभार व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत.

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने १२०० ते १५०० केळीचे नग विकले जातात. यंदा मात्र १०० ही विकले गेले नसल्याने मोठी आर्थिक अडचण झाली आहे. गिऱ्हाईक नाही, हातातले पैसेही अडकले, कष्ट केले पण फळ मिळाले नाही, अशी अवस्था झाली आहे. मागील १७ वर्षात पहिल्यांदाच अशी अडचण झाली. तीन महिने अगोदरच अ‌ॅडव्हान्स देऊन माल तयार करून घ्यावा लागतो. माल विक्री झाला म्हणजे पुढील सणावाराच्या मालाचे योग्य नियोजन करता येते. मात्र यंदा मालच विकला न गेल्याने मोठी आर्थिक चणचण कुंभार व्यावसायिकांना सहन करावी लागणार आहे.

Last Updated : Apr 25, 2020, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.