नाशिक - शहरात दिवसाला एक तरी विनयभंगाचा गुन्हा कुठल्या ना कुठल्या पोलीस ठाण्यात दाखल केल्या जातो. त्यामुळे शहरात महिलांचा सुरक्षेसाठी नाशिक शहर पोलिसांकडून एक नवीन संकल्पना राबवण्यात येत आहे. यासाठी पोलीस दलातील तरुण आणि फिटनेस असलेल्या महिला पोलीस यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक महिला पोलिसांकडे छुपा कॅमेरा असणार आहे.
शहरातील महिला पोलीस अनोखे काम करणार आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या छुपा कॅमेऱ्याने दोनशेहून अधिक ठिकाणचे चित्रीकरण केले जाणार आहे. चित्रीकरण करत असताना महिला पोलिसांसोबत पुरुष पोलीस देखील असणार आहेत. मुली आणि महिला तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे हे विशेष पथक तयार करण्यात येत आहे.
महिला पोलिसांचे हे पथकाची संकल्पना हैदराबाद येथे खूप चांगली पध्दतीने राबविण्यात आली होती. त्याच संकल्पनेवर आधारीत नाशिकमध्येही ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत २०० ते ३०० हॉटस्पॉट निवडले आहेत. फिरतीवर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या छुप्या कॅमेऱ्यात मुलींना त्रास देत असणाऱ्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे. शहरातील महिला सुरक्षित राहण्यासाठी पोलिीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी हे पथक तयार केले आहे.