नाशिक - कोरोनामुक्तीनंतर महिलांना थकवा, अंगदुखी सारख्या समस्या सामोरे जावे लागत आहे. अशात महिलांनी तत्काळ वैद्यकीय सल्ला घेत प्रथिनेयुक्त आहार आणि व्यायाम करण्याचा डॉक्टरांनी दिला आहे.
कोरोनामुक्तीनंतरही अनेक महिलांना थकवा, अंगदुखी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा जेणेकरून पुढील धोका टाळता येऊ शकतो, असे डॉक्टरांनी सागितले आहे. कोरोना काळात शरीराची बहुतांशी झीज झालेली असते. एका आठवड्यापेक्षा जास्त काळ धाप लागणे, अशक्तपणा सारखी लक्षणे आढल्यास याकडे दुर्लक्ष करू नये, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर होण्याची संख्या महिलांच्या तुलनेत अधिक आहे. पण, असे असले तरी कोरोनामुक्त झाल्यानंतरही सतर्क राहणे गरजेचे आहे. आहारात मासे, अंडी, चिकन, पालेभाज्या, कडधान्य यांसारखे प्रथिनेयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. तसेच पुरेशी झोप, व्यायाम, योगा करणे गरजेचे असल्याचे डॉ. वृषाली व्यवहारे यांनी सांगितले आहे.
मोकळ्या हवेत फिरावे
कोरोनामुक्तीनंतर अनेक महिलांना श्वनाचा त्रास होतो. त्यामुळे थकवा जाणवत असतो. अशात महिलांनी हलका व्यायाम, योगा आणि मोकळ्या हवेत फिरल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होते. थकवा दूर होतो, तसेच व्यायाम हा महिलांनी प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार करावा व पोषक आहारावर अधिक भर दिल्यास या समस्यांमधून मुक्ती होण्यास मदत होते.
...यामुळे झाल्या समस्या दूर
महिनाभरापूर्वी मला महिलेला कोरोना झाला होता. 14 दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर घरकाम करताना थकवा, अशक्तपणा जाणवत होता. त्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रथिनेयुक्त आहारावर भर दिला. रोज योगा व हलका व्यायाम केल्यानंतर पुढील दहा दिवसांनंतर त्यांना बरे वाटू लागले, असे कोरोनामुक्त झालेल्या एका महिलेने सांगितले.
हेही वाचा - नाशिक: पाॅझिटिव्ह रुग्ण दर १०.४४ टक्क्यांनी खाली घसरला