Nashik News : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही; शेतकर्यांनी पेरण्यांची घाई करू नये - कृषी विभागाचे आवाहन - Nashik Due to lack of Rain
नाशिक जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने बळीराजा चिंतेत आहे. अर्धा जुलै महिना संपला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. तर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये असे आवाहन, कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
नाशिक : राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस होत असताना, नाशिक जिल्ह्यात मात्र अद्याप पाहिजे तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. जून महिन्यात 5 वेळा पाऊस झाला. एकूण 76.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जुलै महिन्यात आतापर्यंत 7 वेळा पाऊस झाला. केवळ 92.1 पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जिल्ह्यात सरारारी 6 लाख हेक्टरवर पेरण्या केल्या जातात. त्यात यावर्षी आतापर्यंत केवळ 1 लाख 61 हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. यात सर्वाधिक 84 हजार हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. तर सर्वात कमी 9 हजार हेक्टरवर मूग पिकाची पेरणी झाली आहे. मात्र जिल्ह्यात सरासरी पेक्षा केवळ 25 टक्के पेरण्या झाल्याचे, नाशिक जिल्हा कृषी विभागाने सांगितले आहे. तसेच अजूनही समाधानकारक पावसाची गरज असल्याचे, कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांनी सांगितले.
आता पर्यंत झालेल्या पिकांच्या पेरण्या : बाजरी- 12 हजार 127 हेक्टर, मका-82 हजार 75 हेक्टर, मूग-9 हजार 130 हेक्टर, भुईमूग-3 हजार 287 हेक्टर, सोयाबीन- 24 हजार 382 हेक्टर, कपाशी- 28 हजार 19 हेक्टर, एकूण - 1 लाख 61 हजार 686 हेक्टर इतक्या पेरण्या झाल्या आहेत.
आता पर्यंत तालुका निहाय झालेला पाऊस : मालेगाव-71.9 मिलीमीटर, बागलाण-48.8मिलीमीटर, कळवण-85.1 मिलीमीटर, नांदगाव-52.6 मिलिमीटर, सुरगाणा -120 मिलिमीटर, नाशिक- 43.3 मिलिमीटर, दिंडोरी- 57.0 मिलिमीटर, इगतपुरी- 181.7 मिलिमीटर, पेठ-102.7 मिलिमीटर, निफाड- 67 मिलिमीटर, सिन्नर-50.4 मिलिमीटर, येवला- 85.8 मिलीमीटर, चांदवड- 45.6 मिलीमीटर, त्र्यंबकेश्वर- 164.7 मिलिमीटर, देवळाली- 60.9 मिलीमीटर असे एकूण सरासरी पाऊस 76.4 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.
हेही वाचा -