ETV Bharat / state

सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा मंजूर करणार, पालकमंत्र्यांचे आश्वासन

लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा मंजूर करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री आणि वित्तमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

मनमाड पाणीपुरवठा योजना
सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा मंजूर करणार, पालकमंत्र्यांचे आश्वासन
author img

By

Published : Sep 25, 2020, 8:57 AM IST

नाशिक - लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा मंजूर करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री आणि वित्तमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. तसेच सद्यस्थितीत या योजनेतून होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मनमाड पाणीपुरवठा योजना
सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा मंजूर करणार, पालकमंत्र्यांचे आश्वासन

भुजबळ फार्म येथे झालेल्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नव्या आराखड्यास मंजुरी मिळेपर्यंत योजनेच्या पाइपलाइनची जिल्हा परिषदेमार्फत तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दूरध्वनीद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना भुजबळांनी दिले आहेत.

सोळागाव योजनेची पाइपलाइन 15 ते 20 वर्षे जुनी आहे. ती खराब झाल्याने अनेकदा पाणी गळतीची समस्या निर्माण होते. याबाबत भुजबळ यांनी विधान सभेच्या सभागृहात विषय मांडला होता. त्यानुसार सदर योजनेसाठी नवीन पाइपलाइन टाकणे व वीजबिल खर्च कमी करण्यासाठी सौर प्रकल्प बसवण्यास मंजुरी मिळाली होती. एकूण 15 कोटींचा आराखडा मंत्रालयस्तरावर आहे. या संदर्भात बैठकीतूनच दूरध्वनीवरून पाणीपुरवठा विभागाचे सचिव संजय चहांदे यांसोबत भुजबळ चर्चा केली.

पाणी पुरवठ्याची वीज खंडित होऊन अनेक नवनवीन प्रश्न तयार होत असतात. यावर उपाय म्हणून हा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी भुजबळ यांनी दिल्या आहेत. तसेच धुळगाव, राजापूर आणि मनमाड येथील पाणीपुरवठा योजनेची माहिती घेत त्याचेही आराखडे तयार करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.