येवला (नाशिक) - शहरातील रामचंद्र भगत यांच्याकडे तीन रेडे आहेत. ते दर पाडव्याला या रेड्यांची मिरवणूक काढत असतात. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्यांनी आपल्या रेड्यावर "कोरोना एक अशी शर्यत जिथं धावणारा नाही थांबणारा जिंकेल" असा जनजागृतीपर संदेश रेखाटला. तसेच पाडव्याच्या दिवशी सायंकाळी रेड्याची शहरातून मिरवणूक काढली. या रेड्यावर कोरोना योद्धा असलेले पोलीस, डॉक्टर्स, नर्स यांचेही चित्र रेखाटले होते.
हेही वाचा - विहिरीत पडलेल्या गवा रेड्याची अखेर जेसीबीच्या साहाय्याने सुटका
लोकांनी काढल्या सेल्फी -
दर पाडव्याला भगत परिवार रेड्यांवर वेगवेगळे संदेश रेखाटतात. त्यांचा रेडा साडेतीन वर्षांचा असून त्याचे नाव इंद्रा आहे. या रेड्याचे जवळजवळ 1400 किलो वजन आहे. मिरवणुकीत या रेड्यासोबत शहरातील नागरिकांनी सेल्फी काढल्या. रामचंद्र भगत यांच्याकडे अजून 2 रेडे असून त्यांनाही पाडव्यानिमित्त सजवण्यात आले होते व त्याचे नाव रावण व भल्लाल असे आहे.
हेही वाचा - अमरावतीच्या दिवाणखेड्यात रंगली रेड्यांची झुंज; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी