ETV Bharat / state

नाशकात रंगली सखाराम वस्ताद कुस्ती स्पर्धा; महिला गटात प्रज्ञा बिरछेकडून मानसी कहार चीतपट

नाशकात सखाराम वस्ताद कुस्ती स्पर्धा चांगलीच रंगली होती. लेखा नगर भागातील मैदानावर या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सर्व वयोगटातील पहिलावानांनी सहभाग नोंदविला होता.

सखाराम वस्ताद कुस्ती स्पर्धा
author img

By

Published : Apr 19, 2019, 6:40 PM IST

नाशिक - जिल्ह्यात रंगलेल्या सखाराम वस्ताद कुस्ती स्पर्धेत नामवंत पैलवानांचा सहभाग दिसून आला. लेखा नगर भागातील मैदानावर या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच स्पर्धेत महिला गटात प्रज्ञा बिरछेने मानसी कहारचा पराभव केला आहे.

सखाराम वस्ताद कुस्ती स्पर्धा

या स्पर्धेत पुरुष पैलवानांसह साकुर फाट्याच्या प्रज्ञा बिरछेने भगूर येथील मानसी कहारला चितपट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात प्रज्ञाने अत्यंत अवघड डावपेच टाकत मानसीचा पराभव केला. प्रज्ञाला चषक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. दुसरीकडे जुन्या नाशकातील पैलवान शरीफ शेख यांनी येवल्याच्या बाळू पैलवानाचा पराभव करत चषक पटकावला. तर युवा पैलवान उदय काकड आणि काशिनाथ भोये यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत काकड यांनी भोये यांच्यावर मात करत विजय संपादन केला.

श्री काळाराम मंदिर सत्याग्रहपासून ही प्रदिर्घ परंपरा सुरू असून यंदाचे हे 89 वे वर्ष आहे. ज्येष्ठ पैलवान बाळू काकड, शांताराम बागुल, विजय गवळी, रतन सांगळे यांनी पंच म्हणून काम बघितले. तर आनंद सोनवणे, विश्वास ठाकूर, बॉबी काळे, अजित तेजाळे, अजिंक्य तेजाळे, गौतम भालेराव, सतीश सोनवणे, बबलू पठाण उपस्थित होते.

Intro:कुस्तीच्या आखाड्यात प्रज्ञा बिरछेचा मनासी कहार वर विजयी चितपट..
सखाराम वस्ताद कुस्ती दंगल मध्ये नाशिक जिल्ह्यातील नामवंत पाहिलवांचा सहभाग दिसून आला,लेखा नगर भागातील मैदानावर ह्या कुस्तीचे आयोजन करण्यात आलं होतं,
कुस्तीच्या आखाड्यात पुरुष पाहिलवानांन सह नाशिक जिल्ह्यातील साकुर फाटा येथील दंगल गर्ल प्रज्ञा बिरछे हिने भगूर येथील मनासी कहार हिला अचूक चितपट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं,अत्यंत चुरशीच्या झालेल्या ह्या सामन्यात प्रज्ञाने अत्यंत कठीण डावपेच टाकत मानसीचा पराभव केला,ह्या वेळी प्रज्ञाला चषक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आलं, तर दुसरीकडे जुन्या नाशिककातील पहिलवान शरीफ शेख यांनी येवल्याच्या बाळू पहिलवानाचा पराभव करत चषक पटकावला,तर युवा पहिलवान उदय काकड आणि काशिनाथ भोये यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढत मध्ये काकड यांनी भोये यांच्यावर मात करत विजय संपादन केला,श्री काळाराम मंदिर सत्याग्रह पासून प्रदिर्घ ही परंपरा सुरू असून यंदाचे हे 89 वर्ष आहे..ह्या कुस्तीत नाशिक जिल्ह्यातील लहान मोठया वयोगटातील पहिलवान उपस्थित होते..
ह्यावेळी आनंद सोनवणे,विश्वास ठाकूर,बॉबी काळे, अजीत तेजाळे,अजिंक्य तेजाळे,गौतम भालेराव, सतीश सोनवणे, बबलू पठाण उपस्थित होते..
जेष्ठ पहिलवान वाळू काकड,शांताराम बागुल,विजय गवळी,रतन सांगळे यांनी पंच म्हणून काम बघितले
बॉबी काळे आयोजन

Body:नाशिक कुस्ती

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.