ETV Bharat / entertainment

अजय देवगणनं अक्षय कुमार अभिनीत त्याच्या पुढील दिग्दर्शकीय चित्रपटाची केली घोषणा, वाचा सविस्तर - AKSHAY KUMAR

अजय देवगणनं त्याच्या पुढील दिग्दर्शनाच्या चित्रपटाची घोषणा केली असून यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ajay devgan
अजय देवगण (अजय देवगण अक्षय कुमार (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 17, 2024, 10:18 AM IST

मुंबई - अभिनेता अजय देवगण आणि अक्षय कुमार आता चर्चेत आले आहेत. अजयनं त्याच्या 5व्या दिग्दर्शनाच्या चित्रपटाची घोषणा करून त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. आता अजय देवगणच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. खुद्द अजय देवगणनं याबद्दलची माहिती दिली आहे. एका मुलाखतीत अजय देवगणनं सांगितलं की, 'मी एका चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे, यामध्ये अक्षय कुमार हा प्रमुख भूमिकेत असणार आहे. आता या चित्रपटाचा तपशील सांगणे जरा लवकर होऊन जाईल. अजय देवगणनं यापूर्वी 4 चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. अजय हा एक उत्तम दिग्दर्शक आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे.

अजय देवगण निर्मित करणार अक्षय कुमारसाठी चित्रपट : अजय देवगणनं 2008मध्ये 'यू मी और हम' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याचं खूप कौतुक झालं. 'यू मी और हम' चित्रपटानं जवळपास 40 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. यानंतर 2016 मध्ये 'शिवाय' चित्रपटानं जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. 2021 मध्ये 'भोला' आणि 2022 मध्ये त्याचा 'रनवे-34' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आले होते. दरम्यान अजयच्या या आगामी चित्रपटाचं कधी शूटिंग होणार याबाबत काही दिवसांनी माहिती मिळेल. दरम्यान बॉक्स ऑफिसवर सध्या अजय देवगणचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर करिना कपूर , दीपिका पदुकोण, अक्षय कुमार , अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ हे कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केलं आहे.

अजय देवगणबद्दल : दरम्यान अजय देवगणबद्दल सांगायचं झालं तर, त्याचे वडील वीरू देवगण यांनी बॉलिवूडमध्ये स्टंटमॅन म्हणून काम केलं आहे. बालपणापासूनच फिल्मी वातावरणात घरात असल्यामुळे, अजय देवगणला हिरो बनण्याची इच्छा होती, यानंतर त्यानं 1991 मध्ये 'फूल और कांटे' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात अजयनं बॉलिवूडमध्ये ॲक्शन हिरो म्हणून काम केलं. यानंतर त्याला बाकी चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका ऑफर होऊ लागल्या. आता अजय देवगणची गणना बॉलिवूडमधील टॉप-5 सुपरस्टार्समध्ये होते. अजयनं आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 135हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय.

हेही वाचा :

  1. 'सिंघम अगेन'नंतर लगेचच अजय देवगण आणि रोहित शेट्टी सुरू करणार 'गोलमाल 5' ची तयारी
  2. अजय देवगणनं लॉन्च केलं 'आझाद'चं शीर्षक, आमान देवगण करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
  3. 'भूल भुलैया 3'च्या दिग्दर्शकाबरोबर अजय देवगणच्या 'नाम'ची घोषणा, 'सिंघम अगेन' नंतर रिलीज होणार सिनेमा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.