ETV Bharat / state

एकाच दिवसात सुमारे ९४ कोटींचे सोने-चांदी जप्त, मुंबईसह नागपुरात पोलिसांची कारवाई - GOLD SILVER SEIZE

मानखुर्द पोलिसांनी वाशी चेकपोस्टजवळ नाकाबंदी करून शनिवारी सुमारे 80 कोटींचे चांदीचे जप्त केले. तर नागपूर पोलिसांनी 14 कोटींचे सोने-चांदी जप्त केले.

Mumbai police seized silver worth Rs 80 crore
प्रतिकात्मक- सोने चांदी जप्त (Source-ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2024, 10:06 AM IST

Updated : Nov 17, 2024, 10:30 AM IST

मुंबई/नागपूर – विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार टाळण्याकरिता निवडणूक आयोगाचे पथक आणि पोलिसांकडून जागोजागी बंदोबस्त करण्यात येत आहे. नागपूर आणि मुंबई पोलिसांनी एकाच दिवसात सुमारे ९४ कोटींचे सोने आणि चांदी जप्त केले आहे.

विधानसभा निवडणुकीकरिता 20 नोव्हेंबरला मतदान होणार असल्यानं पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी आणि तपासणी सुरू आहे. याच नाकाबंदी दरम्यान मुंबई पोलिसांनी ट्रकमधून सुमारे आठ हजार किलो चांदी जप्त केली आहे. या जप्त केलेल्या चांदीची किंमत सुमारे 80 कोटी रुपये असल्याचं तपास यंत्रणेचं म्हणणं आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी प्राप्तिकर विभाग आणि निवडणूक आयोगाचे पथक करत आहे. सबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

8,476 किलो चांदी!पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्द पोलिसांनी वाशी चेकपोस्टजवळ नाकाबंदी केली होती. तेथून जाणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या वाहनाची झडती घेतली जात होती. तेवढ्यात एक ट्रक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांना संशय आल्यानं त्यांनी ट्रक थांबवला. पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रकची झडती घेतली. ट्रकमागील फाटक उघडल्यावर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण संपूर्ण ट्रक चांदीनं भरलेला होता. या चांदीचे वजन केले असता एकूण वजन 8,476 किलो असल्याचं आढळून आले. इतक्या चांदीची बाजारभाव अंदाजे 79 कोटी 78 लाख 21 हजार 972 रुपये असल्याचे पोलिसांचं म्हणणे आहे.

चांदी कुठे नेण्यात येणार होती?मोठ्या प्रमाणात चांदी आढळून आल्यानं तत्काळ ट्रक चालकाला ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या ट्रक चालकानं चांदी कोणाकडून आणि कोठून आणली? याचा शोध घेण्यासाठी चालकाची चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे. ही चांदी कुणाची आहे? हा ट्रक चालक चांदी कोणाला आणि कुठे पोहोचवणार होता? या सर्व बाबींची प्राप्तिकर विभाग आणि निवडणूक आयोगाची टीम चौकशी करत असल्याचं प्रशासनानं म्हटले आहे.

14 कोटी रुपयांचे सोने-चांदी जप्त-नागपुरातदेखील 14 कोटी रुपयांचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आलं आहे. नागपूर विद्यापीठ समोरील रस्त्यावर नाकाबंदी सुरू असताना 'सिक्वेल लॉजिस्टिक्स' या पुरवठा कंपनीची गाडी पोलीस आणि निवडणूक यंत्रणेच्या पथकाने थांबविली. तेव्हा व्हॅनमध्ये 17 किलो सोने दागिने स्वरूपात आणि 55 किलो चांदी प्लेट्स स्वरूपात आढळली आहे. जप्त करण्यात आलेले सोने आणि चांदी हे विदर्भातील वेगवेगळ्या सराफा व्यावसायिकाच्या ऑर्डरनुसार त्यांना पुरवठ्यासाठी नेली जात होती. त्यासाठी सिक्वेल लॉजिस्टिक या दागिने वाहतूक करणाऱ्या कंपनीची सेवा घेण्यात आली होती. सोन्याचे दागिने आणि चांदीच्या प्लेट्स नागपूरसह अकोला आणि अमरावतीसह विदर्भातील वेगवेगळ्या शहरातील सराफा व्यवसायिकांनी ऑर्डर स्वरूपात मागविण्यात आल्या आहेत. त्या संदर्भातले कागदपत्रे, बिल सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीकडे होते.

  • वाहतूकीची परवानगी नाही- निवडणूक आचारसंहितेच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने-चांदी वाहतुकीच्या माध्यमातून नेण्यासाठी परवानगी लागते. ती परवानगी नसल्यानं तपासणी पथकानं संबंधित सोन्याचे दागिने आणि चांदीच्या प्लेट्स जप्त केल्या आहेत. त्या संदर्भात प्राप्तिकर विभाग तसेच जीएसटी विभागालाही सूचना देण्यात आली आहे.

हेही वाचा-

  1. साताऱ्यात क्रेटा कारमधून १ कोटीची रोकड जप्त, रक्कम नेमकी कुणाची? तपास सुरू
  2. निवडणुकीत पैसाच पैसा? कारमधून 10.8 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त

Last Updated : Nov 17, 2024, 10:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.