ETV Bharat / state

Nashik-Kalvan Road Accident : ट्रॅक्टर आणि कारमध्ये भीषण अपघात सहा ठार, 16 जखमी

author img

By

Published : Jun 3, 2022, 9:27 AM IST

नाशिक-कळवण रस्त्यावरील वणीजवळ मुळाणे बारी येथे ट्रॅक्टर ट्रॉली अल्टो कारवर उलटून झालेल्या अपघातात, विहीर खोदकाम करणारे 5 मजूर व एक बालिका ठार तर 16 जखमी ( Nashik-Kalvan Road Accident ) झाले आहेत. सर्व मृत जळगाव जिल्ह्यातील होते.

tractor-car accident
ट्रॅक्टर आणि कारमध्ये भीषण अपघात

नाशिक: वणी मुळाने बारी मार्गे कळवण रस्त्यावर मार्कंडेय ऋषी पर्वत पायथ्याशी विहीर खोदकाम करणाऱ्या मजुरांना घेऊन दुपारी 3.30 दरम्यान ट्रॅक्टर जात होता. ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडण्यात आल्या होत्या. त्यात मजूर बसलेले होते. त्याच वेळी वळणाजवळ चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही ट्रॉली शेजारून जाणाऱ्या अल्टो कारवर उलटल्या ( Tractor trolley overturns on Alto car ). या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार ( 6 killed in accident ) झाले.

अपघातानंतर अस्थाव्यस्थ पडलेले साहित्य
अपघातानंतर अस्थाव्यस्थ पडलेले साहित्य

या अपघातात पाच मजूर जागेवरच ठार झाले. त्यांचे मृतदेह स्थानिक ग्रामस्थांनी उचलले. त्यात 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच परिसरातील नागरिक मदतीला धावले. ट्रॅक्टर ट्रॉली खाली दबलेल्या व बाजूला पडलेल्या जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातात वणी ग्रामीण रुग्णालयात वैशाली बापू पवार (4), सरला बापू पवार (45), पोपट गिरीधर पवार (40) सर्व रा. उंदीरखेडा ता. पारोळा, जि. जळगाव, बेबाबाई रमेश गायकवाड (40), आशाबाई रामदास मोरे (40), रामदास बळीराम मोरे (48) सर्व रा. अंजनेरा असे एकूण 6 जण ठार झाले आहेत.

अपघातातील जखमी आणि मृतांची नावे
अपघातातील जखमी आणि मृतांची नावे

त्याचप्रमाणे जखमींमध्ये सागर रमेश गायकवाड (23)अंजनेरा, सुरेखा अशोक शिंंदे (22), लक्ष्मण अशोक शिंदे (21) हिंगोणा, संगिता पोपट पवार (45), सुवर्णा पोपट पवार (13), विशाल पोपट पवार (11), आकाश पोपट पवार (15), गणेश बापू पवार (7), बापू पवार (45) सर्व रा. उंदीरखेडा येथील रहिवासी आहेत, तनु दिपक गायकवाड (3), अनुष्का दिपक गायकवाड (1), मनीषा दिपक गायकवाड (24), दिपक बाबुलाल गायकवाड (30) सर्व कसुबाचे आहेत. तसेच प्रिया संजय मस्के (3) रा. जामनेर अजय नवल बोरसे (21) रा. मिराड, असे एकूण 16 जण गंभीर जखमी ( 16 injured in tractor-car accident ) झाले आहेत.

हेही वाचा - Kishor Patil Criticized Kirit Somaiya : 'सकाळपासून टीव्हीवर बसलेला बोबड्या म्हणजेच किरीट सोमैया'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.