ETV Bharat / state

Creta Cars Stolen In Nashik: नाशिकचे चोर क्रेटाप्रेमी चोर! पंधरा दिवसात सहा कार चोरल्या - नाशिकमध्ये पंधरा दिवसात सहा क्रेटा कार चोरीला

नाशिकमध्ये आत्तापर्यंत पंधरा दिवसात सहा क्रेटा कार चोरीला गेल्या आहेत. (Creta Cars Stolen In Nashik). विशेष म्हणजे या क्रेटाकारचे सायरन न वाजताच कार चोरीला जात असल्याने त्यांच्या मोडस ऑपरेंडीवर चर्चा होतं आहे.

Creta car
Creta car
author img

By

Published : Oct 27, 2022, 6:36 PM IST

नाशिक: नाशिक मध्ये क्रेटा कार प्रेमीं चोरांमुळे पोलीस चक्रावले आहेत. पहाटेच्या वेळात कार चोरी करून फरार होणाऱ्या या चोरांमुळे वाहनधारकांची चिंता वाढली आहे. आता पर्यंत पंधरा दिवसात सहा क्रेटा कार चोरीचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. (Creta Cars Stolen In Nashik). विशेष म्हणजे या क्रेटाकारचे सायरन न वाजताच कार चोरीला जात असल्याने त्यांच्या मोडस ऑपरेंडीवर चर्चा होतं आहे.

या ठिकाणाहून कार गेल्या चोरीला: सुरुवातीला जुने पंडित कॉलनीतील रहिवासी सचिन ब्राह्मणकर यांच्या मालकीची (एम एच 15 जीआर 1908) या क्रमांकाची क्रेटा मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास चोरीला गेली. त्या पाठोपाठ लगेच सातपूरच्या कामगार नगर भागातील काळे नगर येथील रहिवासी अनिल काळे यांची क्रेटा चोरट्यांनी त्यांच्या बंगल्यासमोरून चोरून नेली. आणखी एक घटना दसऱ्याच्या दिवशी 9 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली. अवघ्या चार तासाच्या अंतरावर राका कॉलनीतील व्यावसायिक सिल्केश कोठारी यांची क्रेटा कार चोरीला गेली. या पाठोपाठ चेहडी शिवारात आणि मखमलाबाद नाका परिसरात व निफाड इथून क्रेटा कार चोरी गेल्याची घटना घडली. 19 ऑक्टोबर रोजी गंगापूर रोडवरील शांती निकेतन कॉलनीतील रहिवासी प्रशांत उगले यांच्या घरासमोरून क्रेटा क्रमांक( एम एच 15 जीआर 5885) चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे.

सायरन न वाजता कार लंपास: कारचालकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी व सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आलेल्या घटनेवरून मध्यरात्री दोन ते पहाटे चार वाजेच्या सुमारास या घटना घडल्या आहेत, असे समजते. यात तीन ते चार संशयित एका कारमधून येऊन क्रेटा कारच्या मागील बाजूची काच अलगद कटरने फोडून आत घुसतात. कारचा सायरन न वाजता चोरटे तीन ते चार मिनिटात त्या जागेवरून कार गायब करतात. चोरांची मोडस ऑपरेंडीवमुळे पोलीस देखील चक्रावले आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे क्रेटा कार मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.