ETV Bharat / state

Yeola Silent march : झारखंड सरकार विरोधात येवल्यात जैन समाजाचा मूक मोर्चा - येवला जैन समाजाचा मूक मोर्चा

झारखंड राज्यातील मधुबन येथील शिखरजी तीर्थ येथे २० तीर्थक्षेत्रांची कल्याणभूमी आहे. या ठिकाणी झारखंड राज्य सरकारने पर्यटनस्थळ ( Shikharji Tirtha tourist destination ) विकसित करण्याची घोषणा केली आहे. याविरोधात नाशिक जिल्ह्यातील येवल्यात जैन समाजाच्यावतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा ( Silent march of Jain community ) काढून केंद्र व झारखंड सरकारच्या निर्णयाचा विरोध ( Jain community against Jharkhand government ) करण्यात आला.

Yeola Silent march
येवल्यात जैन समाजाचा मूक मोर्चा
author img

By

Published : Dec 21, 2022, 6:00 PM IST

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात जैन समाजाचा मूक मोर्चा

नाशिक : संपूर्ण देशातील जैन धर्मियांचे पवित्र श्रद्धास्थान असलेले सिद्धक्षेत्र महापर्वतराज श्री सम्मेद शिखरजी हे झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र ( Shikharji Tirtha tourist destination ) घोषित केल्याने जैन समाज आक्रमक झाला आहे. झारखंड सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ येवल्यातील जैन समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा ( Silent march of Jain community ) काढून केंद्र व झारखंड सरकारच्या निर्णयाचा विरोध ( Jain community against Jharkhand government ) करण्यात आला आहे. तरी सरकारने श्री सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करू नये, अशी मागणी यावेळी जैन समाजाच्यावतीने करण्यात आली.

केंद्र सरकार विरोधात मूक मोर्चा : झारखंड राज्यातील मधुबन येथील शिखरजी तीर्थ येथे २० तीर्थक्षेत्रांची कल्याणभूमी आहे. या ठिकाणी झारखंड राज्य सरकारने पर्यटनस्थळ विकसित करण्याची घोषणा केली आहे. याला सकल जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. कारण पर्यटनस्थळ झाले की येथे मांसाहार, मद्यविक्रीसुद्धा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कल्याणभूमीत जैन समाजाच्या भावना दुखावल्या जाणार आहेत.

तीव्र आंदोलनाचा इशारा : झारखंड सरकारने या क्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करू नये, याकरिता मूकमोर्चा काढण्यात आला आहे. येवला शहरातील जैन मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत हा मुकमोर्चा काढण्यात आला. झारखंड सरकारने शिखर्जी तीर्थ याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील जैन समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.